एमएस धोनी-रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

IND vs SL T20I: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात यजमान भारतीय संघाने 62 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली, पण बॅट आणि बॉलने आक्रमक खेळ करून एकहाती विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसरा कर्णधार ठरला आणि आता तो माजी कर्णधार एमएस धोनीचा  (MS Dhoni) लंकन संघाविरुद्धचा रेकॉर्ड ध्वस्त करण्याचा आणखी जवळ पोहोचला आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेविरुद्ध सहा वेळा विक्रमी विजय मिळवला आहे. धोनीशिवाय टी-20 क्रिकेटमध्ये भारताला श्रीलंकेविरुद्ध एवढा विजय मिळवून देऊ शकलेला नाही. त्यामुळे आता धर्मशाला येथे होणाऱ्या अंतिम दोन सामन्यात हवामानाने साथ दिल्यास रोहित ‘कॅप्टन कूल’ धोनीच्या देखील वरचढ ठरू शकतो. (IND vs SL: श्रीलंकेवर पहिल्या T20 सामन्यात मोठा विजय मिळवूनही कर्णधार रोहित शर्मा नाराज, म्हणाला विश्वचषकपूर्वी ‘यामध्ये’ सुधारणा आवश्यक)

श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार आहे, ज्याने त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. रोहितने 2017 ते 2022 या कालावधीत श्रीलंकेविरुद्ध 6 सामन्यांमध्ये टी-20 फॉर्मेटचे नेतृत्व केले आहे. तर टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेविरुद्ध धर्मशाला येथे उर्वरित दोनही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर रोहित धोनीच्या पुढे यादीत नंबर एक कर्णधार बनेल. विराट कोहलीबद्दल सांगायचे तर त्याच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेविरुद्ध चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन भारताने जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने एकूण 10 सामने खेळले, त्यापैकी सहा जिंकले आणि चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

दरम्यान शनिवार, 26 मार्च, रोजी दोन्ही संघ धर्मशालाच्या HPCA क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील. पण दुसऱ्या सामन्यासाठी हवामान अनुकूल  हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे धुवून जाण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंका यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 23 टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 15 वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने 7 वेळा भारताला हरवण्यात यश मिळवले आहे.