मोहाली कसोटीत इतिहासाची पुनरावृत्ती (Photo Credit: Twitter)

श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team India) पहिला डाव 574 धावांवर घोषित केला आहे. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) नाबाद 175 धावा केल्या, तर ऋषभ पंतने 96, आर अश्विनने 61 आणि हनुमा विहारीने 58 धावा केल्या. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी कोणत्याही खेळाडूने केलेली ही जडेजाची सर्वोच्च धावसंख्या आहे. तथापि दिवसाच्या दुसऱ्या सत्रापूर्वी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Shrama) जेव्हा डाव घोषित केला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्काच बसला. कारण, त्यावेळी जडेजा 175 रनवर नाबाद खेळत होता. जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये आपले पहले दुहेरी शतक साजरे करेल असे दिसत असताना रोहितने डाव घोषित केला. (IND vs SL 1st Test Day 2: मोहाली कसोटीत ‘सर जडेजा’ ऑन फायर, भारताचा पहिला डाव 574/8 धावांत घोषित)

कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या रोहितच्या या कृतीमुळे नेटकऱ्यांना तब्ब्ल 17 वर्षांपूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोबत झालेल्या अन्यायाची आठवण झाली. 2004 मध्ये भारताच्या पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटी ही घटना घडली होती. त्या सामन्यात वीरेंद्र सेहवागनं तिहेरी शतक झळकावले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तीन शतकी टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय होता. तथापि सेहवागच्या या ऐतिहासिक खेळीसोबतच आणखी एका गोष्टीसाठी त्या सामन्यातून लक्षात राहिली आणि ती म्हणजे जेव्हा सचिन तेंडुलकर 194 रनवर खेळत होता, त्यावेळी टीम इंडियाने आपला डाव घोषित केला होता. त्यामुळे आता 18 वर्षांनी सचिन प्रमाणेच जडेजाचे दुहेरी शतक देखील अपूर्ण राहिले. यामुळे सोशल मीडियावर यूजर्समध्ये मजेदार प्रतिक्रियांसह इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा रंगली आहे.

द्रविडने केली इतिहासाची पुनरावृत्ती

राहुल द्रविडची प्रतिक्रिया

द्रविडला 200 शी काही खरी समस्या आहे!

जडेजा नाबाद आणि भारताचा डाव घोषित

द्रविड साहेबांनी ते पुन्हा केले

रोहितने डाव घोषित केल्यावर द्रविड...

29 मार्च 2004 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुलतान कसोटीत तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडने सचिन तेंडुलकर 194 धावांवर फलंदाजी करत असताना डाव घोषित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. द्रविडच्या घोषणेमुळे तेंडुलकरच्या द्विशतकाची संधी हिरावली ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आणि आता इतक्या वर्षांनंतरही त्याबाबतच्या शंका आणि शेरे कायम आहेत. दुसरीकडे, श्रीलंकाविरुद्ध सामन्याबद्दल बोलायचे तर 7व्या क्रमांकावर फलंदाजीला येत, जडेजाने कपिल देव यांना मागे टाकून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. यापूर्वी, पहिल्या दिवशी भारताने एकूण 357/6 धावांपर्यंत मजल मारली होती.