श्रीलंका विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st T20I Live Streaming: एकदिवसीय मालिकेत 2-1 ने जिंकल्यावर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) रविवारीपासून सुरू होणार्‍या श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) टी-20 मालिकेकडे लक्ष केंद्रित करेल. ऑक्टोबर 2021 मध्ये युएई व ओमान येथे होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भाग घेण्यापूर्वी 3 सामन्यांची मालिका भारतीय संघासाठी ही अखेरची मालिका असेल. टीम इंडिया आपल्या काही युवा खेळाडूंना आजमावून पाहण्यास आतुर असेल. शिवाय, टीम इंडियाकडून वनडेतील कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षा सध्या केली जात आहे. दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. तसेच भारतीय प्रेक्षकांसाठी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल आणि लाईव्ह स्ट्रिमिंग आपण SonyLiv वर पाहायला मिळेल. (IND vs SL 1st T20I: टी-20 आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज, पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरेल तगड्या खेळाडूंची फौज; पाहा संभाव्य प्लेइंग XI)

श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाने वनडे मालिका 2-1 अशी जिंकली. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यावर धवन ब्रिगेडकडे लंकन संघाचा सफाया करण्याची संधी होती पण अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 5 नवोदित खेळाडूंसह प्लेइंग इलेव्हनमध्ये 6 बदल करण्याचा निर्णय फसला आणि संघाला पराभव पत्करावा लागला. संजू सॅमसन वगळता त्या सामन्यात कोणताही पदार्पणवीर बॅटने प्रभावित करू शकला नाही. तसेच अखेरच्या क्षणी नवोदित राहुल चेहराने श्रीलंकेला दणके दिले पण संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरला नाही. त्यामुळे आता टी-20 मालिकेच्या प्लेइंग इलेव्हनकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.

असे आहेत भारत-श्रीलंका संघ

भारतः शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चाहर के गौथम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकारीया.

श्रीलंका: दासुन शनाका (कॅप्टन), धनंजय डी सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथम निसानका, चरित असलंका, वनिंदू हसरंगा, आशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उडाणा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनूरा फर्नांडो, दुश्मंत चमीरा, लक्षण संदकन,अकिला डानंजया, शिरण फर्नांडो, धनंजय लक्ष्मण, ईशान जयरात्ने, प्रवीण जयविक्रम, असिथ फर्नांडो, कसुन राजिता, लाहिरू कुमारा, इसुरु उदाना.