IND vs SA Test 2019: टीम इंडियाच्या टेस्ट संघातून बाहेर झाल्यानंतर केएल राहुल करतोय Chill, Twitterati म्हणाले कधी खेळावर ही लक्ष दे
केएल राहुल (Photo Credit: Twitter)

खराब फॉर्ममुळे टीम इंडियाच्या टेस्ट संघातून बाहेर पडलेला केएल राहुल (KL Rahul) आपला फॉर्म सुधरवण्याच्या प्रयत्नात आहे. वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध टेट्स मालिकेत राहुलच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे त्याला दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या 3 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात (Indian Team) स्थान मिळाले नाही. आफ्रिकाविरुद्ध टी-20 ड्रॉ झाल्यावर टीम इंडिया आता टेस्ट मालिकेसाठी सज्ज होत आहे. याआधी, राहुलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि यावर लोकं त्याला जोरदार ट्रोल करत आहेत. राहुलने चिल्ड बाथ घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या फोटो सोशल मीडियावर लोकांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय, अनेकांनी तर त्याला खेळावर लक्ष केंद्रित करायाला सांगितले. (केएल राहुल ला मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद नी दाखवला मार्ग, टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी दिला 'हा' सल्ला)

फोटो शेअर करताना राहुलने कॅप्शनमध्ये लिहिले, 'चिलिंग (अक्षरशः)'. राहुल ज्या सिलिंडर चेंबरमध्ये बंद आहे त्याला 'क्रायोजेनिक चेंबर' असे म्हणतात. या चेंबरमध्ये, सिलिंडर नायट्रोजन गॅस भरलेले असते. ही एक प्रकारची थेरपी आहे ज्याने मानवी स्नायूंना आराम मिळते आणि दुखापतीपासून मुक्त होण्यास मदत मिळते.

राहुलला ट्रोल केलेले ट्विट येथे पहा:

आपल्या खेळाकडेही लक्ष द्या

काल आफ्रिका वाल्यांनी देखील चिल्ड करून टाकले

हाहााहा ... प्रथम त्याला त्याचे स्थान प्राप्त करण्यास सांगा

तू हेच कर

क्रिकेट बंद का भाई

राहुल बर्याच काळापासून संघर्ष आहे. त्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे सुसंगतता आणि चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीमध्ये रूपांतरित करण्यामध्ये अयशस्वी होणे. मध्ये-मध्ये त्याने चांगली खेळी केली, पण नंतर अनेक सामन्यांमध्ये त्याची कामगिरी खराब झाली. वेस्ट इंडीज दौर्‍यावर राहुल दोन कसोटी सामन्यांच्या 4 डावांमध्ये अवघ्या 101 धावा करू शकला. यानंतर 2 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेसह होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी राहुलला वगळण्यात आले आणि त्याच्या जागी सलामीवीर म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) याची पदोन्नती झाली.