IND vs SA T20I Series 2024: न्यूझीलंडचा संघ सध्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. पाहुण्या संघाने पुणे कसोटी जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे, आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 4 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल. अशा परिस्थितीत या दौऱ्यासाठी भारतीय संघाची बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आली आहे. पण त्याआधी या मालिकेशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्सवर एक नजर टाकूया.
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आले होते आमनेसामने
आम्ही तुम्हाला सांगतो की भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ पुरुषांच्या टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दुसरे विजेतेपद पटकावले. यापूर्वी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता.
हेड टू हेड रेकॉर्ड
टी-20 आंतरराष्ट्रीय मधील दोन देशांमधील विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर त्यात भारताचाच वरचष्मा आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 27 पैकी 15 वेळा टी-20 सामन्यात पराभूत केले आहे, तर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध 11 सामने जिंकले आहेत. एक सामना निकालाविना संपला. (हे देखील वाचा: India Squad for South Africa T20I Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, रमणदीप, विजयकुमार आणि यशदयाल मिळाली संधी)
कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिक यांच्यातील टी-20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग भारतातील स्पोर्ट्स 18 टीव्ही चॅनलवर पाहता येतील. याव्यतिरिक्त, सर्व सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिक मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना- डर्बन (8 नोव्हेंबर)
दुसरी टी-20 सामना- गकबेर्हा (10 नोव्हेंबर)
तिसरा टी-20 सामना- सेंच्युरियन (13 नोव्हेंबर)
चौथा टी-20 सामना- जोहान्सबर्ग (15 नोव्हेंबर)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार, अवेश खान, यश दयाल