वेस्ट इंडिज संघाला त्यांच्याच घरात धूळ चारल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) आता दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाशी दोन हात करण्यास सज्ज होत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात या महिन्याच्या 15 तारखेपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना धर्मशाला येथे खेळला जाईल. यंदाच्या टीम इंडियामध्ये आफ्रिकाविरुद्ध अनेक बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे हार्दिक पंड्या याचे विश्वचषकनंतर पुनरागमन झाले आहे तर, फिरकी गोलंदाजांची जोडी, युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव यांना वगळण्यात आले आहेत. शिवाय, महेंद्र सिंह धोनी याने देखील या मालिकेसाठी आपली अनुपस्थिती दर्शवली आहे. (हार्दिक पंड्या vs कृणाल पंड्या: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेआधी पंड्या बंधू आले आमने-सामने, पहा कोण राहिला वरचढ)
टीम इंडियामध्ये अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडूंवर जबाबदारी वाढली आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आधीच सांगितले आहे की नवीन आणि युवा चेहऱ्यांनी पुढाकार घेत आपला ठसा उमटवावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे लवकरच सुरु होणाऱ्या टी-२० मालिकेत युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. इथे आपण 5 खेळाडूंवर नजर टाकूया ज्यांच्यावर सर्वांची नजर असेल:
कृणाल पंड्या (Krunal Pandya)
पदार्पणानंतर, कृणालने सर्वात टी-20 च्या भारतीय संघात स्वत:ला अष्टपैलू म्हणून स्थापित केले आहे. त्याचा स्वभाव प्रभावशाली ठरला आहे आणि कोहलीने त्याचा उपयोग क्रंच परिस्थितीत चांगल्या प्रकारे केला आहे. विंडीजविरुद्ध देखील काही मॅचमध्ये त्याने चांगली खेळी केली होती. पण, काही डाव वगळता त्याला आपली फलंदाजी अधिक सुसंगत करणे आवश्यक आहे आणि आगामी मालिकेमध्ये त्याला ही संधी मिळू शकते.
रिषभ पंत (Rishabh Pant)
भविष्यात धोनीचा पर्याय म्हणून पहिले जात असलेल्या पंतकडे मोठ्या आशेने पहिले जात आहे. विंडीजविरुद्ध सामान्य पंत प्रभावी खेळी करण्यास अपयशी राहिला. कोहलीने पंतविषयी खूप सकारात्मक गोष्टी केले आहे आणि निवड समितीनेही त्याला सर्व प्रारूपांमध्ये भारताचा प्राथमिक विकेटकीपर म्हणून प्राधान्य दिले आहेत. ईशान किशनने घरगुती सेट अपमध्ये सातत्यपूर्ण धावा फटकावल्यामुळे पंतला अधिक सातत्य शोधण्याची गरज आहे आणि त्यामुळे ही मालिका त्याच्यासाठी मोठी कसोटी ठरणार आहे.
नवदीप सैनी (Navdeep Saini)
वेगवान गोलंदाजसैनीने नुकतेच आपल्या टी-20 कारकीर्दीला सुरुवात केली आहे. विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेने सैनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आजवर त्याने 2 टी-20 सामने खेळले आहे आणि यात 5 विकेट घेत 7.09 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. शिवाय, विंडीजविरूद्ध तो विशेषत: नव्या चेंडूवर प्रभावी खेळी केली होती आणि फलंदाजांना मुश्किलीत पडले होते. पण, डेथ ओव्हर्समध्येही कर्णधार विराट कोहली याला त्याचा वापर करण्याची इच्छा असल्याने त्याला आपल्या गोलंदाजीच्या शैलीत अजून कौशल्य जोडण्याची गरज आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan)
विश्वचषकचा एक सामना वगळता धवनला परिणामकारक खेळी करण्यास अपयश आले. विश्वचषकमध्ये दुखापत झालेल्या धवनने विंडीजविरुद्ध मर्यादित षटकारांच्या मालिकेतून पुनरागमन केले पण, तो काही खास करू शकला नाही. त्यामुळे सध्या धवन धावांचा भुका आहे. आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध मालिके त्याला ती भूक मिटवण्याचा आणि पुन्हा लय पकडण्याची संधी देऊ शकते.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya)
हार्दिकची स्थिती देखील काहीशी धवन प्रमाणेच आहे. विश्वचषकनंतर पंड्याला देखील भारतीय संघातून विश्रांती देण्यात आली होती. पंड्याला विश्वचषकमध्ये दुखापत झाली होती ज्यामुळे त्याचा विंडीज दौऱ्यावर टीम इंडियात समावेश केला जाऊ शकला नाही. पण, तब्बल दोन महिन्यांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा कसा खेळ करतो यावर सर्वांच्या नजरा असतील.
आतापर्यंत टी -20 मालिकेत दोन्ही संघ 14 वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत. त्यापैकी भारताने आठ आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाच सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वँडरर्स स्टेडियमवर झालेल्या टी -20 सामन्यात दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडले होते. 2018 मध्ये या दोन संघांमधील शेवटच्या वेळी तीन सामन्यांची टी -20 मालिका होती. विश्वचषकनंतर दक्षिण आफ्रिका संघाचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे. विश्वचषकमध्ये आफ्रिका संघ सर्व सामन्यांमध्ये संघर्ष करीत दिसत होता. त्यामुळे आता हा संघ कसा प्रदर्शन करतो यावर सर्वांचे लक्ष लागून असेल.