हार्दिक आणि कृणाल पंड्या (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात तीन सामन्यांची टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतिल पहिला सामना हिमाचल प्रदेशमधील सुंदर मैदानावरील धर्मशाला (Dharamsala) येथे खेळला जाईल. या टी-20 मालिकेपूर्वी पंड्या बंधू नेट्समध्ये सराव करताना दिसले आहेत. विश्वचषकनंतर एकही सामना न खेळलेल्या हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे तर वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मॅचमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या कृणाल पंड्या (Krunal Pandya0 याला देखील दक्षिण आफ्रिका विरुद्ध होम मॅचसाठी संघात स्थान मिळाले आहेत. विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत कृणालला 'मॅन ऑफ थे सिरीज' चा पुरस्कार देण्यात आला होता. (IND A vs SA A: मॅच दरम्यान मानेवर चेंडू लागल्यावर शिखर धवन काय बोलला, संजू सॅमसन याने केला खुलासा, पहा Post)

अलीकडेच हार्दिकने त्याच्या हेलिकॉप्टर शॉट्सचा मारण्याचा सराव करण्याचा व्हिडिओ एक व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. पंड्या बंधू टीम इंडिया आणि आयपीएल संघ मुंबई इंडियन्स कडून एकसाथ खेळतात. पण, या नेट सरावा दरम्यान दोन्ही बंधू एकमेकांसमोर आले. हार्दिकने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये, कृणाल हार्दिकला गोलंदाजी करतोय आणि हार्दिक पूर्ण ताकदीने मोठे शॉट्स मारत आहे. कृणालने टाकलेला एक चेंडू तर हार्दिकने त्याच्या डोक्यावरूनच मारला आणि कृणाल बालम-बाल वाचला. संपूर्ण व्हिडिओमध्ये हार्दिक लयमध्ये दिसत होता आणि अत्यंत अचूकतेने फलंदाजी करताना दिसला. पहा व्हिडिओ:

दुसरीकडे, वर्ष 2018 में मध्ये भारत टी-20 संघात डेब्यू करणारा ऑलराउंडर कृणाल संघात कायम राहिला आहे. आतापर्यंत 14 सामने खेळलेल्या क्रुणालने मागील अनेक मालिकांमध्ये मॅन ऑफ द सीरिज आणि सामनावीरचा पुरस्कार जिंकला आहे. शिवाय, तो भारतीय संघात अष्टपैलू म्हणून कायम आहे. पांड्याने आपल्याकडे येणारी संधी दोन्ही हातांनी पकडली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.