IND vs SA T20 Series: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 संपल्यानंतर आता भारत (India) आणि दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) खेळाडू आगामी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या तयारीला लागणार आहेत. आयपीएल (IPL) 2022 नंतर सर्वांचे लक्ष आता या दोन देशांमधील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेकडे लागले आहे. आगामी टी-20 विश्वचषकची तयारी म्हणून पहिल्या जाणाऱ्या या मालिकेने भारतीय संघ (Indian Team) तब्ब्ल दोन महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय मैदानात परतणार आहे. या मालिकेतून आयपीएलमध्ये एकाच संघाकडून सोबत खेळलेले धुरंधर खेळाडू आमनेसामने येतील. आयपीएलचे अनेक सहकारी, जे आतापर्यंत एकाच संघात मित्र म्हणून खेळले होते, ते आता या मालिकेत एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. (IND vs SA T20 Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका या धुरंधर खेळाडूंसाठी निर्णायक, मिळू शकते T-20 विश्वचषकचे तिकीट)
1. क्विंटन डी कॉक विरुद्ध आवेश खान
लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या पहिल्या आयपीएल हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. यामध्ये सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि वेगवान गोलंदाज आवेश खान या दोघांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेच्या स्टार यष्टीरक्षक-फलंदाजाने सुमारे 150 च्या स्ट्राइक रेटने 508 धावा केल्या, तर आवेश 18 विकेट्ससह संघाचा आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज ठरला. या मालिकेत दोघेही मित्र आमनेसामने येणार आहेत.
2. डेविड मिलर विरुद्ध हार्दिक पांड्या
आयपीएल 2022 चे चॅम्पियन गुजरात टायटन्स या मालिकेत डेविड मिलर आणि हार्दिक पांड्या या दोन प्रमुख खेळाडूंचा आमाणसामाना होणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी केली. मिलरने 481 धावा केल्या तर हार्दिक पांड्याने 487 धावा केल्या. गुजरातचा कर्णधार हार्दिकने आयपीएल दरम्यान 8 विकेट्स घेतल्या, त्यापैकी 3 विकेट त्याने फायनलमध्ये घेतल्या. आता हे पाहणे बाकी आहे की हार्दिक मिलरला आयपीएल 2022 मध्ये इतर खेळाडूंप्रमाणे टक्कर देण्यात यशस्वी होतो की नाही?
3. एनरिच नॉर्टजे विरुद्ध ऋषभ पंत
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज नॉर्टजे दुखापतीमुळे आयपीएल 2022 चे महत्त्वाचे सामने खेळू शकला नाही. आयपीएल दरम्यान तो फक्त 8 सामने खेळला. पण भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होणे अपेक्षित आहे आणि या मालिकेत आपली खरी क्षमता दाखवण्यास उत्सुक असेल. तो त्याचा दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत विरुद्ध खेळेल, ज्याला आयपीएल 2022 च्या खराब हंगामानंतर स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल.
4. रस्सी व्हॅन डर डुसेन विरुद्ध युजवेंद्र चहल
आयपीएल 2022 उपविजेता राजस्थान रॉयल्स रॅसी व्हॅन डेर डुसेनच्या कामगिरीवर खूश नसेल. त्याला तीन संधी देण्यात आल्या, ज्यामध्ये तो केवळ 22 धावाच करू शकला. मात्र, दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना त्याच्यातील खरा खेळाडू जागा होतो, हे आपण लक्षात राहणे गरजेचे आहे. या मालिकेत त्याला राजस्थानचा सहकारी युजवेंद्र चहलकडून मोठे आव्हान मिळू शकते. चहलने आयपीएल 2022 मध्ये पर्पल कॅप काबीज केली.
5. ड्वेन प्रिटोरियस विरुद्ध ऋतुराज गायकवाड
आयपीएल 2022 मधील उत्कृष्ट कामगिरीनंतर, गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल अशी आशा आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजाने या मोसमात 368 धावा केल्या. या मालिकेत तो प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला तर त्याला या मालिकेत ड्वेन प्रिटोरियसच्या घातक गोलंदाजीचा सामना करावा लागेल. प्रिटोरियसने आयपीएल 2022 मध्ये सीएसकेसाठी 6 सामने खेळले ज्यात त्याने खूप चांगली कामगिरी केली.