IND Squad for SA T20I Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात होतील मोठे बदल; पाहा कोण करणार आराम, कोणाच्या हाती असेल संघाची कमान
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND Squad for SA T20I Series: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा थरार सध्या आपल्या शिखरावर आहे. अनेक तरुण आणि वयस्कर खेळाडू टी-20 क्रिकेट आपला ठसा उमटवत आहेत. अनुभवी खेळाडू संघात पुनरागमन करण्याचा जोरदार दावा करत असताना पहिल्यांदाच टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी युवा खेळाडू देखील मागे राहिले नाहीत. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. त्यापूर्वी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया (Team India) 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दोन्ही संघातील पाच सामन्यांची मालिका वेगवेगळ्या ठिकाणी खेळली जाईल. यासाठी भारतीय संघातील अनेक बड्या खेळाडूंना आराम देण्यात येण्याची शक्यता आहे. (IND vs SA T20I 2022: विराट कोहलीला दक्षिण आफ्रिका मालिकेतून मिळणार आराम? असे झाल्यास ताबडतोड फलंदाजी करणारा ‘हा’ बनू शकतो नंबर 3 चा दावेदार)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याच्या दावेदारांमध्ये अनेक खेळाडू आहेत. संघात सलामीवीर कर्णधार म्हणून रोहितसोबतच केएल राहुल (KL Rahul) आणि ईशान किशन यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. कर्णधार असल्यामुळे रोहितला विश्रांती मिळणे कठीण आहे, तर किशन सध्या धावा करण्यासाठी संघर्ष करत असूनही त्याला संघात स्थान निश्चित मानले जात हे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे मधल्या फळीत स्थान मिळण्याच्या दावेदारांमध्ये श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन यांचा समावेश आहे. तसेच हार्दिक पांड्या संघात अष्टपैलू म्हणून पुनरागमन करू सह्कतो. हार्दिकने आयपीएलमध्ये गोलंदाजी सुरु केली असून वेंकटेश अय्यरला टक्कर देत आहे.

दुसरीकडे, रवींद्र जडेजा फिरकी अष्टपैलू म्हणून संघात सामील होईल. तर फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन देखील शक्यता आहे. पण यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत पहिली पसंती असेल. जम्मू-काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने टीम इंडियासाठी आपली दावेदारी भक्कमपणे मांडली आहे. त्याच्या जोडीला टी नटराजनही संघात पुनरागमन करेल, जो दुखापतीमुळे बराच काळ बाहेर बसला होता. याशिवाय जसप्रीत बुमराहला आराम देण्यात येळ भवुनेश्वर कुमार अनुभवी गोलंदाज म्हणून संघात सामील होई. त्याचवेळी त्याला साथ देण्यासाठी आवेश खान आणि हर्षल पटेल देखील असतील. फिरकी आक्रमणात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलचे पुनरागमन निश्चित मानले जात आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपल्या फिरकीपुढे फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी संभाव्य भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, आवेश खान, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव.