टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

Indian Team for SA: उमरान मलिक आणि मोहसीन खान यांसारख्या आयपीएलच्या (IPL) स्टार खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील त्यांच्या कामगिरीचे बक्षीस फळ मिळेल, जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी (South Africa Series) रविवारी भारतीय संघ (Indian Team) निवडला जाईल. तसेच अनुभवी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांचे T20 संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) देखील आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून आपला फॉर्म आणि फिटनेस दाखवला आहे, ज्यामुळे त्याला 9 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकानंतर तो भारताकडून खेळलेला नाही. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातील निवड समितीची रविवारी मुंबईत दोन स्वतंत्र संघ निवडण्यासाठी बैठक होणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील एक संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील दुसरा संघ 15 जूनला इंग्लंडला रवाना होईल. सोमवारपर्यंत संघाची घोषणा केली जाईल असे अपेक्षित आहे. (IND vs SA Series 2022: टीम इंडियावर दुखापतीने सावट आणखी गडद, आणखी एक तडाखेबाज खेळाडू दक्षिण आफ्रिका मालिकेला मुकण्याची शक्यता)

पांड्या अखेरीस नियमितपणे गोलंदाजी करत आहे जो राष्ट्रीय संघात त्याच्या पुनरागमनाच्या प्रयत्नासाठी महत्त्वपूर्ण होता. दोन महिन्यांच्या आयपीएल आणि 15 जून रोजी कसोटी संघांच्या प्रस्थानामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह सर्व फॉरमॅटमधील खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. जूनच्या अखेरीस आयर्लंडमध्ये होणार्‍या दोन टी-20 सामन्यांसाठी असाच संघ निवडला जाण्याची अपेक्षा आहे. असे झाल्यास कर्णधारपदाची जबाबदारी धवन किंवा हार्दिक यांच्या खांद्यावर येऊ शकते. धवनने गेल्या वर्षी श्रीलंकेत संघाचे नेतृत्व केले होते, तर पांड्याने गुजरात टायटन्ससाठी पदार्पणाच्या हंगामात कर्णधार म्हणून प्रभावित केले आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक मोठ्या प्रतीक्षेनंतर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत तर उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांना प्रथमच संघात स्थान दिले जाऊ शकते.

दीपक हुडा आणि व्यंकटेश अय्यर यांना वेस्ट इंडिज व श्रीलंका मालिकेत मधल्या फळीत खेळवले होते, त्यामुळे या दोघांपैकी कोण संघातील स्थान कायम ठेवते हे पाहणे बाकी आहे. फलंदाजी विभागात तिलक वर्माने त्याच्या पहिल्याच आयपीएल हंगामात चांगली कामगिरी केली आहे आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी देखील त्याचा विचार केला जाऊ शकतो. याशिवाय दिनेश कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी 'फिनिशर'च्या भूमिकेत जोरदार दावा केला आहे आणि तो भारतीय संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. या मोसमात कठीण परिस्थितीत गुजरातला विजय मिळवून देणाऱ्या राहुल तेवतिया यालाही संधी दिली जाऊ शकते. तसेच गोलंदाजी विभागात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवचा फॉर्म देखील लक्षवेधी होती. अशा परिस्थितीत कदाचित ‘कुलचा’ जोडी पुनरागमन करू शकते. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी अद्याप काही महिने शिल्लक आहेत परंतु दक्षिण आफ्रिका मालिकेपासून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार्‍या आयसीसी स्पर्धेसाठी त्यांच्या मुख्य संघातील खेळाडूंचा निर्णय घेण्याची कल्पना संघ व्यवस्थापनाने घेतली असेल.