चेतन शर्माच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समिती दक्षिण आफ्रिकेच्या आगामी दौऱ्यासाठी (South Africa Tour) संघाची निवड करणार आहे. यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) एकदिवसीय संघाचे कर्णधारपद कायम राहते की नाही यावरही निर्णय घेतला जाईल. बीसीसीआयच्या (BCCI) उच्चपदस्थांनी सांगितले आहे की भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour of South Africa) शेड्यूलनुसारच आहे, तरीही ते आफ्रिकी देशातील नवीन COVID-19 व्हेरियंट भोवतीच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. ऑस्ट्रेलियातील आणखी एका जागतिक आयसीसी स्पर्धेमुळे 2022 मध्ये प्रामुख्याने टी-20 चे वर्चस्व असेल, तर पुढील सात महिन्यांत फक्त नऊ वनडे सामने खेळले जाणार आहेत ज्यात सहा (दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये प्रत्येकी तीन) परदेशात आणि तीन भारतात होणार आहेत. (IND vs SA 2021-22: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर BCCI चे मोठे भाष्य, म्हणाले - ‘दौरा कायम, पण खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरि’)
एक बायो-बबल असल्याने, एक जंबो पथक निवडला जाण्याची शक्यता आहे. सर्व फॉरमॅट विचारात घेऊन संघाची संख्या 20 ते 23 खेळाडूंची असू शकते. “भारतीय पथकाची घोषणा येत्या काही दिवसांत केली जाईल. आम्ही आमच्याकडून सर्वकाही तयार करू आणि मग सरकारच्या होकाराची वाट पाहू. जर सरकारने आम्हाला दौरा रद्द करण्यास सांगितले, तर आम्ही करू, परंतु आम्हाला तसे ठेवणे आवश्यक आहे. संघ निवडला आणि तयार आहे,” बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी पीटीआयला सांगितले. दरम्यान BCCI मधील एक गट विराट कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदी कायम ठेवण्याच्या बाजूने आहे, तर दुसरा गट टी-20 आणि वनडे दोन्ही संघांचे कर्णधारपद एकाच खेळाडूकडे सोपवण्याच्या बाजूने आहे, जेणेकरून रोहित शर्माला (Virat Kohli) 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी चांगली तयारी करण्याची संधी मिळेल.
याप्रकरणी जोरदार युक्तिवाद होत असल्याचे समजले जात आहे परंतु एकदिवसीय कर्णधार म्हणून कोहलीच्या भवितव्यावर अंतिम निर्णय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह घेतील. कोहलीची कोणतीही मोठी बहु-सांघिक स्पर्धा जिंकण्यात असमर्थता त्याच्या विरोधात जाते, परंतु त्याचा एकूण विक्रम या फॉरमॅटमध्ये चांगला राहिला आहे. दुसरीकडे, सध्या BCCI आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका संपूर्ण द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी कटिबद्ध आहेत जोपर्यंत भारत सरकारकडून दौर्याविरुद्ध कोणताही विशिष्ट सल्ला मिळत नाही.