भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA Test 2021-22: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) भारताविरुद्ध  (India) कसोटी मालिकेची प्रत्येक चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड देशात कसोटी मालिकेत तिरंगा फडकावलेल्या टीम इंडियाला (Team India) आता आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. तर दुसरा सामना जोहान्सबर्ग (Johannesburg), वांडरर्स स्टेडियमवर आयोजित केला जाईल. हा सामना दोन्ही संघच नव्हे तर क्रिकेट बोर्डांसाठी देखील विशेष असेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (Cricket South Africa) बुधवारी पुष्टी केली की ते पुढील वर्षी जोहान्सबर्ग येथील वँडरर्स स्टेडियमवर (Wanderers Stadium) होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतासोबतच्या क्रिकेट संबंधांची 30 वर्षे साजरी करणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी विशेष व्यवस्था केली आहे. (IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाला CSA चा दिलासा; कोविड-19 बूस्टर डोससह, देशात Omicron ची परिस्थिती बिघडल्यास एक्झिटचे दरवाजे ठेवले खुले- Reports)

दक्षिण आफ्रिकेला 1970 ते 1991 पर्यंत 21 वर्षांसाठी जागतिक क्रिकेटमधून हद्दपार करण्यात आले कारण वंशभेदामुळे देशातील कृष्णवर्णीय खेळाडूंना वांशिक भेदभावाला सामोरे जावे लागत होते. अखेरीस 1991 मध्ये निलंबन मागे घेण्यात आले आणि मोहम्मद अझरुद्दीनचा भारत 10 नोव्हेंबर (1991) रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर क्लाईव्ह राईसच्या प्रोटीज विरुद्ध खेळणारा पहिला संघ बनला. केपलर वेसेल्सच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने नोव्हेंबर 1992 मध्ये अझरच्या टीम इंडियाविरुद्ध डर्बनमध्ये मायदेशात पहिला कसोटी सामना खेळला जो की अनिर्णित राहिला. CSA ला भारताच्या विशेष दौर्‍याची 30 वर्षे पूर्ण झाल्याची खूणगाठ बांधायची आहे आणि दोन्ही संघांमधील काही सर्वात प्रतिष्ठित क्षण आणि व्यक्तींचा सन्मान करून खास क्षण साजरा करायचा आहे. “भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट संबंधांच्या 30 वर्षांच्या वर्धापन दिनाच्या एक भागामध्ये स्टेडियमच्या 30 वर्षांच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षण आणि व्यक्तींचा उत्सव व ओळख समाविष्ट आहे,” CSA ने निवेदनात म्हटले आहे.

26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांपैकी पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मालिका विजयाच्या दिशेने पुढे जाण्याच्या प्रयत्नात असेल. मालिकाचा अंतिम सामना केपटाउनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर होईल. 11 जानेवारीपासून केपटाऊन येथे तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जाईल. त्यानंतर 19 जानेवारीपासून पार्ल आणि केपटाऊनमध्ये 3 वनडे खेळणार आहेत. देशात कोविड-19 आणि ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्यामुळे सर्व सामने चाहत्यांशिवाय खेळले जातील.