भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा कसोटी सामना रांची येथे 19 ऑक्टोबरपासून खेळला जाणार आहे. यापूर्वी मालिका गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला तिसर्या कसोटीपूर्वी एकामागून एक धक्का लागत आहे. संघाचे सलामी फलंदाज एडन मार्क्रम (Aiden Markram) याला पुणे (Pune) टेस्टदरम्यान दुखापत झाली होती, आणि त्यामुळे आता त्याला तिसऱ्या आणि अंतिम टेस्टला मुकावे लागणार आहे. यापूर्वी, फिरकीपटू केशन महाराज यालाही रांची कसोटीमधून बाहेर पडावे लागले होते. या मालिकेत मार्क्रम फारशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही आणि पुणे कसोटीत पराभव झाल्यावर रागाने त्याने त्याचा हात एका जड वस्तूवर मारला, ज्यामुळे त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली आहे. पुणे टेस्टच्या दोनी डावात मार्क्रम शून्यावर बाद झाला. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव आणि 137 धावांनी पराभव झाला होता. (IND vs SA 2nd Test 2019: भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा टेस्ट सामना ठरला ऐतिहासिक, फक्त चार दिवसांमध्ये बनले इतके रेकॉर्ड)
दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या डावात मार्क्रम एलबीडब्ल्यू बाद झाला होता. त्यानंतर त्याने सहकारी खेळाडू डीन एल्गर याच्याशी बोलणी केली आणि नंतर रिव्यू घेतला नाही. पण, रिप्लेच्या वेळी स्पष्ट झाले की चेंडूमध्ये स्टंपच्या बाहेरच्या बाजूला वळत होता. यावर मार्करम खूप निराश झाला. पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावातही मार्करम अपयशी ठरला, पहिल्या डावात 5 धावा आणि दुसऱ्या डावात 39 धावांचे योगदान दिले.
सप्टेंबर 2017 मध्ये बांग्लादेशविरुद्ध टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या मार्क्रमने कसोटी क्रिकेटमध्ये 4 शतके आणि 6 अर्धशतक केली आहेत. दरम्यान, मार्क्रमची दुखापत गंभीर आहे आणि यामुळे तो काही दिवस फलंदाजी करू शकणार नाही.