भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये सलामी फलंदाज रोहित शर्मा याने सावध खेळी करत शतक पूर्ण केले. रोहितचे हे सहावे टेस्ट शतक असून या मालिकेतील हे तिसरे शतक आहे. या खेळीदरम्यान रोहितने 27 चौकार आणि 4 षटकार लगावला. रोहितने 130 चेंडूत शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, भारताच्या डावाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे चांगली झाली नाही. भारतणारे 50 धावांच्या आता 3 विकेट गमावले. आफ्रिकी गोलंदाजांनी सुरुवातीपासून दबाव ठेवला होता. पण, नंतर रोहितने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्यासाथीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला आणि भारताला 150 पार करून दिला. रोहित एकीकडे वेगाने धावा करत होता तर रहाणे सावधपणे खेळत होता.
रोहितने या शतकादरम्यान आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधील 2,000 धावांचा टप्पा गाठला. भारतीय क्रिकेटपटूंपैकी टेस्ट मध्ये दोन हजार धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत रोहित सध्या 39 व्या स्थानावर आहे. शिवाय, रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी मालिकेत अर्धशतक झळकावले. यासह त्याने आफ्रिकाविरुद्ध सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azhruddin) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांची बरोबरी केली. या तिन्ही खेळाडूंनी आफ्रिकाविरुद्ध 3 अर्धशतकं केली आहेत. रोहितने 86 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे, रोहितने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एका मालिकेत 400 धावादेखील पूर्ण केल्या. रोहितने यासहअझरुद्दीन आणि माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याला पिछाडीवर टाकले. अझरुद्दीनने आफ्रिकाविरुद्ध एका मालिकेत 388 तर सेहवागने 372 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहितने पहिल्यांदा भारतासाठी डावाची सुरुवात केली आणि पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक ठोकले. त्याने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या डावात 123 धावा केल्या. यानंतर, पुणे कसोटी सामन्यात तो केवळ 14 धावा करू शकला. पण, रांचीमध्येतो पुन्हा फॉर्ममध्ये परतला. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर कसोटीत रोहितचे हे पहिले अर्धशतक आहे.