भारतीय टेस्ट संघाचा (Indian Team) उपकर्णधार अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane) याने दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध शतकी खेळी केली. रहाणेच्या टेस्ट कारकिर्दीतील हे11 वे टेस्ट शतक आहे, तर यंदाच्या आफ्रिकाविरुद्ध मालिकेतील पहिले शतक आहे. रहाणेने आफ्रिकाविरुद्ध या टेस्ट मालिकेत 15, नाबाद 27 आणि 59 धावा केल्या आहेत. रहाणेने आपले शतक 169 चेंडूंत पूर्ण केले. यादरम्यान रहाणेचा स्ट्राईक रेट 59.17 होता. या खेळी दरम्यान त्याने 14 चौकार आणि एका षटकार ठोकले. रहाणेनंतर सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने यंदाच्या मालिकेतील दुसऱ्यानंद दीडशे धावा पूर्ण केल्या. रोहितने 199 चेंडूत दीडशे धावा केल्या. शिवाय, दोन्ही फलंदाजांमध्ये द्विशतकी भागीदारीदेखील पूर्ण झाली आहे. रोहित-रहाणेने 292 चेंडूत 200 धावांची भागीदारी पूर्ण केली. (भारतीय चाहत्याकडून दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूला चरणस्पर्श; Quinton De Kock झाला भाऊक मारली मिठी, चाहत्याची चप्पलही दिली उचलून)
आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या 10 फलंदाजांमध्ये असलेल्या रहाणेने 2016 नंतर पहिल्यांदा भारतात कसोटी शतक केले. ऑक्टोबर 2016 नंतर रहाणेने ऑक्टोबर 2019 मध्ये शतक झळकावले. पहिल्या दिवशी 50 धावांच्या आत 3 विकेट गमावल्यावर रोहित आणि रहाणेने भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारताने सलामीवीर मयंक, पुजारा आणि कर्णधार कोहली यांच्या तीन महत्त्वाच्या विकेट गमावल्या. पहिल्या दिवसानंतर आफ्रिकी गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आले नाही. आफ्रिकासाठी पहिल्या दिवशी कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याने मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांना बाद केले तर एनरिच नॉर्टजे याने कर्णधार विराट कोहली यानाला माघारी धाडले.
दुसरीकडे, रहाणेचे हे दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसरे कसोटी शतक आहे. यापूर्वी रहाणेने न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 2-2 शतकं ठोकली आहेत. तर, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध त्याने एक शतक केले आहे.