भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. यामॅच मध्ये पहिले फलंदाजी करत भारताने पहिल्या दिवसाखेर 3 बाद 244 धावा केल्या. सलामी फलंदाज रोहित शर्मा याची बॅटिंग महत्वपूर्ण ठरली. पण, या मॅचदरम्यान असे काही घडले जे एखाद्या प्रेक्षकाच्या हृदयाला स्पर्श करून गेली असती. मागील दोन मॅचप्रमाणे या सामन्यातदेखील एक फॅन मैदानात घुसून आला. पुणे कसोटी सामन्यात रोहितला गाठण्यासाठी एक चाहता मैदानात घुसला होता आणि त्याच्यापासून स्वतःला वाचवता वाचवता रोहित मैदानातच पडला. तर, तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्याच हा चाहता रोहित, विराट कोहली किंवा अन्य कोणत्याही भारतीय खेळाडूला भेटण्यापेक्षा दिवशी दक्षिण आफ्रिका संघाचा विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) याला भेटण्यासाठी मैदानात घुसला. (IND vs SA 2nd Test: मॅचदरम्यान रोहित शर्मा याच्या चाहत्याने सुरक्षा भंग केल्याबद्दल सुनील गावस्कर संतापले, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर केले 'हे' मोठे विधान)
हा क्रिकेट फॅन डी कॉक फिल्डिंग करत करताना त्याच्या जवळ पोहचला. या चाहत्याने डिकॉकला मिठी मारली आणि त्याच्या पाया पडला. त्याच्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले आणि मैदानाबाहेर नेले. एका स्पोर्ट्स्टार पत्रकाराने ट्विटद्वारे संपूर्ण गोष्ट स्पष्ट केली. यात त्याने म्हटले की, या चाहत्याने आश्चर्यचकित झालेल्या डी कॉकच्या पायाला स्पर्श केला आणि त्याने सुरक्षारक्षकांकडून हाताळण्यापूर्वी त्याने चाहत्याला मिठी मारली. इतकेच नाही तर, सुरक्षारक्षक त्या चाहत्याला मैदानाबाहेर घेऊन जात असताना त्याची स्लीपर पायातून सुटली, तेव्हा, डी कॉकने 'हरकत नाही' म्हणत परत केली. डी कॉकचे त्या चाहत्याच्याप्रति असा जेस्चर खरंच कोणाचंही मन जिंकण्यासारखे आहे.
Bizarre scenes: A fan runs onto the field and hugs Quinton de Kock, even touches his feet. The security guards tackle him down but it seems the fan forgot his slipper on the way back. Never mind, Quinty says, as he returns it. @sportstarweb
— Ayan (@ayan_acharya13) October 19, 2019
दरम्यान, आजपासून सुरु झलेल्या मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. आणि ५० धावांच्या आत संघाने ३ विकेट गमावले. कगिसो रबाडा याने मयंक अग्रवाल आणि नंतर चेतेश्वर पुजारा याला बाद केले. त्यानंतर, एनरिच नॉर्टजे याने विराट कोहली याला माघारी धाडले. विराट नॉर्टजेची टेस्टमध्ये पहिली विकेट ठरली.