दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 224 धावा केल्या. सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) 117 धावांवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 83 धावांवर खेळत होते. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. शनिवारी भारताने टॉस जिंकला तेव्हा यजमान कर्णधार कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला. या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाला सुरुवातीला मोठे धक्के बसले. संघातील पहिले तीन सर्वोत्तम फलंदाज- मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली स्वस्तात आऊट झाले. त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य राहणे यांनी मिळवून संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांमध्ये दिवसाखेर शानदार भागीदारी झाली. (IND vs SA 3rd Test: रोहित शर्मा याचे 6 वे टेस्ट शतक; मोहम्मद अझरुद्दीन, वीरेंद्र सेहवाग यांना पिछाडीवर करत आफ्रिकाविरुद्ध मालिकेत केल्या 400 धावा)
रोहित आणि रहाणे यांच्यात पहिल्या दिवसाखेर शतकी भागीदारी झाली. यादरम्यान, रोहितने सहावे टेस्ट शतक पूर्ण केले तर राहणेने ११ वे टेस्ट अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी चौथ्या विकेटसाठी दोंघांमध्ये 168 धावांची भागीदारी झाली आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत डावाच्या पाचव्या ओव्हरमध्ये कगिसो रबाडा याने भारताला मोठा धक्का दिला. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने मयंकची विकेट घेतली. स्लिपमध्ये डीन एल्गार याने शानदार झेल घेवून मयंकला 10 धावांवर बाद केले. मयंकला बाद झाल्यानंतर रबाडाने चेतेश्वर पुजारा याला खाते न उघडताच माघारी धाडले. रबाडाने जोरदार अपील केली, पण अंपायरने आऊट दिले नाही आणि नंतर कर्णधार फाफ डू प्लेसी याने रिव्यू घेण्याचा निर्णय घेतला आणि थर्ड अंपायरने निर्णय रबाडाच्या बाजूने घेत पुजाराला एलबीडब्ल्यू बाद केले. यांच्यानंतर एनरिच नॉर्टजे याने टेस्ट करिअरमधील पहिली विकेट घेत भारताचा कर्णधार विराट कोहली याला बाद केले.
एनरिचच्या एलबीडब्ल्यूच्या अपीलवर अंपायरने आऊट दिले, पण कोहलीने रिव्यू घेतला आणि अंपायरने कोहलीला 12 धावांवर आऊट संघात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टीम इंडियाने आधीच मालिका जिंकली आहे, त्यामुळे तिसरी कसोटी औपचारिकता आहे. पण टीम इंडियाचा 3-0 क्लीन-स्वीप मिळवत मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीतआफ्रिकेला 203 धावांनी पराभूत केले, तर दुसर्या कसोटी सामन्यात भारताने डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला होता.