IND vs SA 3rd Test 2022: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील कसोटी मालिकेतील निर्णायक सामना केप टाउनच्या न्यूलँड्स (Newlands) येथे आजपासून सुरु झाला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघ (Indian Team) प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात 223 धावा केल्या. पहिल्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. मात्र यानंतर कर्णधार विराट कोहलीने डाव सावरला. यादरम्यान कोहलीने अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे केप टाउनच्या (Cape Town) खेळपट्टीवर जिथे फलंदाजांना बचाव करताना अडचणी येत होत्या, तिथे भारतीय कर्णधार कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले. खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या कोहलीने तिसऱ्या कसोटीत अप्रतिम संयम दाखवला आणि 28 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहलीने आपले अर्धशतक 158 चेंडूंमध्ये पूर्ण केले, ज्यात 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. विराट कोहलीने या अर्धशतकाने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली त्याचे हे अर्धशतक अनेक अर्थाने खूप खास आहे. (IND vs SA 3rd Test Day 1: विराट कोहलीच्या 79 धावा, भारताचा पहिला डाव 223 धावांत आटोपला; रबाडाच्या विकेटचा चौकार)
1. विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 158 चेंडू खेळले. उल्लेखनीय म्हणजे त्याने 50 टक्के चेंडू खेळले नाही. विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत प्रथमच पन्नास पूर्ण करण्यासाठी इतके चेंडू खेळले आहेत. यापूर्वी 2012 मध्ये विराटने पर्थमध्ये असेच काही केले होते. पर्थ कसोटीत विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 40 टक्के चेंडू सोडले होते.
2. केपटाउन कसोटी सामन्यात विराट कोहलीने कारकिर्दीतील दुसरे सर्वात संथ अर्धशतक झळकावले आहे. कोहलीने 2012-13 मध्ये इंग्लंडविरुद्ध नागपूर कसोटीत 171 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. म्हणजेच विराट कोहलीचे हे परदेशी भूमीवर सर्वात संथ अर्धशतक आहे.
3. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत पाचव्यांदा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. केप टाउनमध्ये त्याने सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि चेतेश्वर पुजारा यांना मागे टाकले, ज्यांनी प्रत्येकी 4 वेळा ही कामगिरी केली आहे.
4. विराट कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्यांदा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या आधी हा पराक्रम भारताच्या कोणत्याही कर्णधाराला करता आलेला नव्हता. एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर यांनी दक्षिण आफ्रिकेत कसोटी कर्णधार म्हणून एकदाच 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.