फाफ डू प्लेसिस, रिद्धिमान साहा (Photo Credit: Instagram)

पुणे कसोटीत टीम इंडिया (Indian Team) डावासह विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा कसोटी सामना जिंकून टीम इंडिया सध्याच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवून मालिका खिशात घालतेल. भारतीय संघाच्या शानदार गोलंदाजीत विकेटकीपर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याचे महत्वाचे योगदान आहे. तब्बल दीड वर्षांनी भारतीय टेस्ट संघात पुनरागमन करणाऱ्या साहाने तो टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक असल्याचे सिद्ध करण्यास कसर सोडली नाही. सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये आफ्रिकेच्या मोठ्या फलंदाजांना बाद करण्यासाठी साहाने काही अप्रतिम झेल पकडले आणि सर्वांनाच आश्चर्यात पडले. या मॅचमध्ये साहाने आजवर तीन कॅच पकडले आणि त्याची फिटनेस पाहून चाहतेदेखील चाम्बहीत राहिले. (IND vs SA 2nd Test Day 4: रिद्धिमान साहा याने झेलला Superman कॅच; चाहत्यांसह विराट कोहली देखील झाला अचंबित, पहा Video)

आर अश्विन याचा एक चेंडू आफ्रिकी कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस (Faf du Plessis) याच्या बॅटच्या किनाऱ्याला लागून साहाकडे गेला पण चेंडू नीट ग्लोव्हजमध्ये आला नाही. आणि त्याने तो जिग्लिंग केला आणि 4 वेळा पकडला. डू प्लेसिसचा हा झेल एकदा साहाच्या ग्लोव्हजला लागला, पण तो नीट ग्लोव्हजमध्ये आला नाही. साहा चेंडू पकडण्याचा प्रयत्न करत राहिला आणि त्याने दोनदा पकडण्याचा प्रयत्न केला पण ग्लोव्हजमध्ये चेंडू योग्यप्रकारे येत नव्हता. दरम्यान, तिसऱ्या प्रयत्नात प्रयत्नांत त्याने बॉल हवेत उंचावला आणि चौथ्या प्रयत्नात समोर डाइव्ह केले आणि झेल पकडला. अशाप्रकारे डु प्लेसिस बाद झाला. पहा हा मजेदार व्हिडिओ:

साहाचा हा जगलिंग ऍक्ट पाहून सोशल मीडियावर चाहतेदेखील प्रभावित झाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू श्रीवत्स गोस्वामी याने स्टम्पच्या मागे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल साहाचे कौतुक केले.

रिद्धिमान साहा सध्या जगातील सर्वोत्कृष्ट रक्षणकर्ता आहे यात काही शंका नाही

पंतला शक्यतोवर संघाबाहेर ठेवण्यासाठी साहा नाटकीय कॅच घेत आहे

रिद्धिमान 'किंवा सुपरमॅन' किंवा फ्लाइंग साहा

कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आधीच हे स्पष्ट केले आहे की रिद्धिमान साहा हा जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपरंपैकी एक आहे. भारताच्या खेळपट्ट्यांवर चांगल्या यष्टीरक्षकांना संघर्ष करावा लागतो, परंतु साहा इथे मजबूत यष्टीरक्षक आहे. तब्बल दीड वर्षानंतर साहाने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहेत. या कसोटी मालिकेपूर्वी त्याने जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरूद्ध अखेरची कसोटी खेळली होती जिथे तो जखमी झाला होता. यानंतर पंतने विकेटकीपर म्हणून टीम इंडियामध्ये स्थान मिळवले होते.