
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) येथे सुरु असलेल्या दुसर्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचे सहा फलंदाजांना बाद केले. यासह अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 356 विकेट्स पूर्ण केल्या. यासह अश्विनने डेनिस लिली (Dennis Lillee) आणि माजी श्रीलंका क्रिकेटपटू चमिंडा वास (Chaminda Vaas) यांना मागे टाकले. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मागील कसोटी सामन्यात सर्वात वेगवान 350 बळी घेण्याचा विक्रम अश्विनने आपल्या नावावर केला होता. पुण्यात सामना होण्यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 350 बळी मिळवले होते. तर डेनिस लिली आणि वासने 355 विकेट्स घेतले आहेत. अशाप्रकारे, अश्विनला लिली आणि वासचा विक्रम मोडण्यासाठी सहा विकेट्सची गरज होती. (IPL 2020: रविचंद्रन अश्विन याच्या Kings XI Punjab संघाबरोबरच्या भविष्याबाबत सह-मालक नेस वाडिया यांनी केले 'हे' मोठे विधान, वाचा सविस्तर)
अश्विनने दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात चार विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात डीन एल्गार आणि फाफ डू प्लेसिस यांची विकेट घेतली. आणि ३५६ टेस्ट विकेट्स पूर्ण केल्या. अश्विनने 66 सामन्यात 350 कसोटी बळी घेतले आहेत. अश्विन आपल्या कारकीर्दीचा 67 वा सामना खेळत आहे. लिलीने 70 आणि वासने 111 सामन्यात 355 विकेट्स घेतले होते. दुसरीकडे, आफ्रिकाविरुद्ध कसोटी सामन्यात अश्विनने 50 विकेट पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकाविरूद्ध 50 विकेट घेणाराअश्विन चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनने पाहुण्या संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, विकेटकीपर क्विंटन डी कॉक, कगिसो रबाडा आणि केशव महाराज यांची विकेट मिळवली. यासह अश्विनचा अनिल कुंबळे, हरभजन सिंह आणि जवागल श्रीनाथ यांच्या यादीत प्रवेश मिळवला आहे. या सर्वांनी आफ्रिकाविरुद्ध टेस्ट सामन्यात 50 हून अधिक विकेट्स घेतल्या. कुंबळेने 84 विकेट घेऊन पहिल्या स्थानावर आहे. तर श्रीनाथ आणि हरभजनने अनुक्रमे 64 आणि 60 विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान, भारतीय संघाला दुसऱ्या सामना जिंकण्यासाठी अजून 5 विकेट मिळवण्याची गरज आहे. तिसऱ्या दिवशी आफ्रिकेला 275 धावांवर बाद करून चौथ्या दिवशी टीम इंडियाने फॉलोऑन दिला होता. याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा अर्धा संघ माघारी परतला आहे.