IND vs SA 2nd Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वांडरर्स स्टेडियमवर तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. दिवसाच्या सुरुवातीला फॉर्मशी झगडत असलेल्या चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) बॅट तळपली आणि त्याने 32 वे कसोटी अर्धशतक झळकावले. पुजारा गेल्या काही सामान्यांपासून दडपणाखाली आहे. पुजाराने या खेळीत 62 चेंडूंचा सामना केला 10 चौकार लगावले. पुजाराने अजिंक्य राहणेसह अर्धशतकी भागीदारी करून संघाची आघाडी शंभरी पार पोहचवली आहे.
FIFTY for Cheteshwar Pujara in just 62 balls!
Who saw that coming? 🔥 #SAvIND
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 5, 2022