
Shardul Thakur In Johannesburg: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. ठाकूरने यजमान दक्षिण आफ्रिकेच्या डावात 7 विकेट घेत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. द वांडरर्स येथे भारताकडून कसोटी सामन्याच्या एका डावात 5 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा शार्दुल हा सहावा गोलंदाज ठरला. शार्दूलपूर्वी मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि अनिल कुंबळे यांनी हा पराक्रम केला आहे. (IND vs SA 2nd Test Day 2: ‘लॉर्ड’ शार्दूल ठाकूरने 7 विकेट घेतल्या; दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 229 धावांत गारद, टीम इंडियावर 27 धावांची नाममात्र आघाडी)
ठाकूरपूर्वी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनिल कुंबळेने 1992/93 मध्ये 53 धावांत 6 बळी घेतले होते. यानंतर जवागल श्रीनाथने 1996/97 मध्ये 104 धावांत 5 विकेट घेतल्या. तर 2006/07 मध्ये श्रीशांतने 40 धावांत पाच विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर तब्ब्ल दहा वर्षानंतर जसप्रीत बुमराहने 2017/18 मध्ये 54 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. आणि 2018 वर्षी मोहम्मद शमीने 28 धावांत 5 विकेट घेतल्या. जोहान्सबर्ग कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात 202 धावांतगारद झाला. यानंतर प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाने त्यांच्या डावात 229 धावा केल्या आणि 27 धावांची नाममात्र आघाडी घेतली. इतकंच नाही तर सामन्यात एकेकाळी दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात भारतीय संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत होते, मात्र शार्दुलने आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर संघाला पुनरागमन करून दिले.
यश Proteas विरुद्ध पहिल्या डावात चमकदार कामगिरी करून आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. दक्षिण आफ्रिकेत ठाकूरने आपल्या गोलंदाजीने इतिहास रचला. तो दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाज ठरला आणि त्याने हरभजन सिंहचा विक्रम मोडला. भज्जीने 2010-11 मध्ये केपटाऊन येथे 7/120 आकडेवारीची नोंद केली होती, पण आता शार्दुलने या सामन्यात 7/61 घेत त्याचा विक्रम मोडला आणि यादीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.