IND vs SA 2nd Test Day 1: तशी 142 किमी वेगाने जीवघेणा बाउन्सर हेल्मेटवर आदळला, तरीही मयंक अग्रवाल याने ठोकले अर्धशतक, पहा व्हिडिओ
मयंक अग्रवाल (Photo Credits: IANS)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात दुसरा टेस्ट सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. टॉस जिंकून भारताने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीच्या तासात भारतीय संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याला वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने बाद करून पहिला धक्का दिला. भारतविरुद्ध मॅचमधून टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) याने पहिली ओव्हर 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करत केली. नॉर्टजेची गोलंदाजी इतकी घातक होती की एक चेंडू मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याच्या हेल्मेटला लागला. नॉर्टजेचा 142 केएम वेगचा बॉल थेट अग्रवालच्या हेल्मेटला लागला. (IND vs SA 2nd Test Day 1: विराट कोहली ने मोडला सौरव गांगुली चा रेकॉर्ड, एमएस धोनी याच्यासह 'या' यादीत झाला समावेश)

सामन्याच्या दुसर्‍या ओव्हरदरम्यान मयंक थोडक्यात बचावला. नॉर्थजेचा नॉकआउट बॉल पटकन मयंककडे आला आणि त्याच्या हेल्मेटकडे लागून सीमारेषेपार गेला. मयंकला कोणतीही दुखापत झाली नाही तो चेंडू त्याच्या हेलमेटच्या वरच्या टोकाला लागला. तरीही, खेळाडूची सुरक्षा लक्षात घेऊन टीम इंडियाच्या फिजिओने लगेच अग्रवालची तपासणी केली आणि त्यानंतर तो बॅंटिंग करण्यासाठी खेळपट्टीवर परतला. विशेष म्हणजे, हेल्मेटवर नॉर्टजेचा चेंडू खाल्ल्यानंतर मयंकने पुढच्याच चेंडूवर जोरदार शॉट मारत एक शानदार चौकार जडला.

यांच्यानंतर, मयंकने 112 चेंडूत चौथे अर्धशतक पूर्ण केले. मयंकने सलग तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 50 हून अधिक धावा केल्या आहेत. पुणे कसोटीत अर्धशतक ठोकण्यापूर्वी मयंकने विशाखापट्टणम कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 215 आणि वेस्ट इंडिजविरूद्ध किंग्स्टन कसोटीत 55 धावा केल्या होत्या. यंदाच्या मॅचमध्ये मयंकने केशव महाराज याच्या चेंडूवर चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. अग्रवालने 112 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 50 धावांचा टप्पा ओलांडला. मयंकने चेतेश्वर पुजारा याच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.