
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने मैदानात टॉससाठी उतरताच माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना मागे टाकत देशासाठी एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसरा टेस्ट सामना विराटचा कर्णधार म्हणून 50 वा टेस्ट सामना आहे. यासह त्याने गांगुलीला मागे टाकले आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्यासह पन्नास किंवा अधिक टेस्टमध्ये संघाचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवले आहे. गांगुली कर्णधार म्हणून 49 कसोटी सामन्यासह तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. धोनीने भारतासाठी सर्वाधिक 60 टेस्ट सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविले आहेत.60 टेस्ट सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा धोनी हा भारतीय कर्णधारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ('Run-Machine' विराट कोहली याच्यासारखा दिसणारा पुणेचा 'हा' युवा बनला रातोरात स्टार; दोन हवालदार करतात सुरक्षा)
भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी:
60: एमएस धोनी
49 *: विराट कोहली
49: सौरव गांगुली
47: सुनील गावस्कर / मोहम्मद अझरुद्दीन
40: मन्सूर अली खान पतौडी
गांगुलीच्या नेतृत्वात संघाने 21 सामन्यात विजय मिळवला आहे तर 13 मॅचमध्ये पराभवाला सामोरे गेले आहेत. दुसरीकडे, आजवर विराटच्या नेतृत्वात संघाने 49 टेस्ट सामन्यात 29 सामन्यात विजय आणि 10 मॅचमध्ये पराभव चाखला आहे. विशेष म्हणजे, अन्य भारतीय टेस्ट कर्णधारांमध्ये विराटचा रेकॉर्ड सर्वात प्रशंसनीय आहे. दरम्यान, या खास दिवसाआधी कोहलीला याबद्दलचे महत्व विचारले असता कोहलीने सांगितले की, तो स्वतःला खूप भाग्यवान मनात आहे आणि शक्य तितकं सामना जिंकण्यावर त्यांचे लक्ष आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध आजपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आजच्या या निर्णायक मॅचमध्ये टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. हनुमा विहारी याच्या जागी उमेश यादव याला संघात स्थान मिळाले आहेत.