रॅसी व्हॅन डर डुसेनचा विवादास्पद कॅच (Photo Credit: Twitter)

IND vs SA 2nd Test Day 2: जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे यजमान दक्षिण आफ्रिका  (South Africa) आणि भारत (India) यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) रॅसी व्हॅन डर डुसेनला  (Rassie van der Dussen) ब्रेकपूर्वीच्या अंतिम षटकात बाद करण्यापूर्वी घेतलेल्या झेलवरून नवा वाद सुरु झाला आहे. शार्दुल ठाकूरने विकेटच्या मागे कॅचसाठी अपील केले, तर मैदानावरील पंच मारायस इरास्मसने त्याला आऊट दिला आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मैदानातून बाहेर चालत जाऊ लागला आणि पहिल्या सत्रात कठीण संघर्षानंतर टीम इंडियाला (Team India) तीन मोठ्या विकेट मिळाल्या. तथापि, टीव्ही रिप्लेवर बारकाईने पाहिल्यावर पंतच्या ग्लोव्हजमध्ये चेंडू पोहचण्यापूर्वी चेंडूने मैदानावर स्पर्श केल्याचे दिसले. दिवसाच्या पहिल्या सत्राखेरीस झालेल्या या घटनेने सोशल मीडियावर आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. (IND vs SA 2nd Test 2022: हनुमा विहारी ठरला जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा बळी, दक्षिण आफ्रिकेच्या Rassie van der Dussen ने चपळतेने पकडला अप्रतिम कॅच)

दरम्यान, माईक हेसमन आणि सुनील गावस्कर यांनीही त्यांच्या समालोचन दरम्यान हेच लक्षात घेतले, आणि भारताच्या माजी क्रिकेटपटूने असा युक्तिवाद केला की बॅटरने ते बरोबर पकडला गेला आहे की नाही तो पुन्हा तपासण्यासाठी थांबला नाही आणि लगेच चालायला लागला. समालोचन करत असलेले भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेने दिवसाचा खेळ 4 विकेट्स गमावून पुन्हा सुरू केला तरीही दृश्य निर्णायक नव्हते. “तो एक जाड आतील कडा होता. तो बॅटमधून आला की नाही याचा काही प्रश्नच नाही. तो लॉब झाला का हा प्रश्न आहे. या प्रकारची चित्रे कधीच निर्णायक नसतात. त्यांनी रिषभ पंतकडून तपास करून घ्यायला पाहिजे होते,” गावस्कर म्हणाले.

पंतच्या ग्लोव्हजमध्ये बाऊन्स होण्यापूर्वी चेंडू जमिनीला लागला का?

निश्चितपणे चेंडू जमिनीला लागला...

“तो मैदानावर लागला का?

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर आणि टीम मॅनेजर यांनी व्हॅन डेर डुसेनच्या वादग्रस्त झेलबाबत पंचांची भेट घेतल्याचे क्रिकबझने वृत्त दिले. तथापि, तिसर्‍या थर्ड अंपायरकडे मैदानावरील पंच मारायस इरास्मसचा बाद करण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी आवश्यक पुरावा नसल्यामुळे रॅसी व्हॅन डर डुसेन आऊट असल्याचा निर्णय अंतिम असल्याचे कळवले.