रिषभ पंत (Photo Credit: Facebook)

IND vs SA 2nd Test 2022: जोहान्सबर्गच्या द वांडरर्स येथे भारत (India) आणि दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी पाहायला मिळाली. कर्णधार केएल राहुल, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar), रॅसी व्हॅन डर डुसेन, जसप्रीत बुमराह आणि मार्को जॅन्सेन यांसारखे खेळाडू शाब्दिक युद्धात सामील झाले. जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा यष्टीरक्षक रिषभ पंतही (Rishabh Pant) दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवर मजेशीर कमेंट करताना दिसला आणि त्याच्या कमेंट्स स्टंप माइकमध्ये कैद झाल्या. पंतने व्हॅन डर डुसेन आणि कर्णधार एल्गर या दोघांनाही जशास तसे उत्तर दिले. डुसेन फलंदाजी दरम्यान आपला बॅटिंग गार्ड सेट करत होता, तेव्हा पंत विकेटच्या मागून म्हणाला, “पाच-सहा चेंडूंनंतर त्यांचा बॅटिंग गार्ड कुठे आहे हे त्यांना कळत नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि त्यांना ते माहीतही नाही.” यानंतर पंतने कॅप्टन एल्गरला छेडले आणि म्हणाला, “तो एक महान कर्णधार आहे, तो फक्त स्वतःचा विचार करतो.” (IND vs SA 2nd Test Day 3: जसप्रीत बुमराह-Marco Jansen यांच्यात झाला राडा, वांडरर्सवर भारत-दक्षिण आफ्रिका खेळाडू भिडले, असे शांत झाले प्रकरण)

यापूर्वी दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या पंतने दक्षिण आफ्रिकेच्या स्टार फलंदाजाला तोंड बंद ठेवायला सांगितले. “तुम्हाला अर्धे ज्ञान असेल, तर तोंड बंद ठेवा,” पंतने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या डुसेनला फटकारले. खेळपट्टीवर दोन्ही खेळाडूंमध्ये हे संभाषण सोशल मीडियावर टीम इंडियाच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. डुसेनसोबत पंतच्या वादानंतर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही मुंबई इंडियन्सचा माजी साथीदार मार्को जॅन्सनचा समाचार घेतला. जोहान्सबर्ग येथे दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीच्या सत्रात भारतीय टेलंडर्सनी प्रोटीस गोलंदाजी आक्रमणाला निराश केल्यानंतर जॅन्सनने बुमराहला स्लेज केले. यादरम्यान जॅन्सन बुमराहला सतत बाउन्सर टाकून बॉलने देखील त्रास देताना दिसला.

तोंड बंद ठेव!

सामन्याबद्दल बोलायचे तर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा एल्गर 46 आणि डुसेन 11 धावांवर नाबाद खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेने दिवसाखेरीस 2 बाद 118 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी अतिरिक्त 122 धावांची गरज आहे. तर मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेण्यासाठी टीम इंडियाचे लक्ष उर्वरित आठ विकेट्स घेण्यावर असेल. तसेच जोहान्सबर्ग येथे भारताच्या दुसऱ्या डावात अर्धशतके झळकावून फॉर्मशी झगडत असलेलं चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा लयीत परतले. पुजाराने 86 चेंडूत तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक (53) ठोकले, तर माजी उपकर्णधार रहाणेने भारतासाठी 78 चेंडूत 58 धावा केल्या.