IND vs SA 2nd T20I: क्विंटन डी कॉक, तेम्बा बावुमा यांची शानदार फलंदाजी; टीम इंडियाला 150 धावांचे लक्ष्य
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credits: Getty Images)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये कर्णधार क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि नंबर 3 फलंदाज तेम्बा बावुमा (Temba Bavuma) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने 5 बाद 149 धावा केल्या. भारतासमोर दुसरा टी-20 सामना जिंकण्यासाठी 150 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. डी कॉकने 52 तरबावुमा अर्धशतक पूर्ण करू शकला नाही आणि 39 धावांवर माघारी परतला. दक्षिण आफ्रिकाने मॅचची सुरुवात चांगली केली. कर्णधार डी कॉक याने रीझा हेंड्रिक्स याच्या साथीने सावध सुरुवात केली. पण, हेंड्रिक्स त्याला जास्त साथ देऊ शकला नाही आणि फक्त 6 करून झेल बाद झाला. डेविड मिलर 18 धावा करून बाद झाला. त्याने 15 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 18 धावा केल्या. (IND vs SA 2nd T20I: विराट कोहली याने टिपला जबरदस्त धावता एक हाती झेल, क्विंटन डी कॉक अर्धशतक करून आऊट, पहा Video)

मात्र, भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दोन ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करता आली नाही. पहिल्या तीन ओव्हरमध्येच टीम इंडियाने 31 धावा लुटवल्या. त्यानंतर चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर भारताला पहिले यश मिळाले. चाहरने रीझा हेंड्रिक्सला बाद केले. त्यानंतर कर्णधार कॉकच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने डाव सावरला. डी कॉकनं 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत भारताच्या जलद गोलंदाजांची क्लास घेतली. पण, 52 धावांवर खेळत असताना सैनीच्या चेंडुवर कॅप्टन कोहलीने अप्रतिम झेल घेत, संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये रवींद्र जडेजा याने रॅसी वॅन डर डुसेनला एका धावावर बाद केले. डी कॉक बाद झाल्यानंतर क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या टेम्बा बवुमा आक्रमक फलंदाजी केली, मात्र 49 धावांवर त्याला चाहरनं बाद केले. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला. आणि नंतर त्यांना सावरता आले नाही.  टीम इंडियासाठी यंदाच्या सामन्यात दीपक चाहर याने प्रभाव पडला. चाहरने 4 ओव्हरमध्ये 22 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले तर रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या आणि नवदीप सैनी यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. सैनीची शेवटची ओव्हर भारतासाठी महाग ठरली. या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने 16 धावा केल्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा दुसरा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली येथे खेळला जात आहे. दोन्ही संघातील पहिला सामना धर्मशाळा येथे खेळवला जाणार होता, मात्र पावसामुळे तो रद्द करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचा संघ मागील दोन दौऱ्यापासून टी-20 मालिकेत भारताला घरच्या मैदानावर पराभूत करीत आला आहे. त्यामुळे, यंदा टीम इंडिया विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली हा रेकॉर्ड मोडण्याच्या निर्धारित असेल.