विराट कोहली (Photo Credit: @BCCI/Twitter)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील दुसऱ्या टी-20 सामना मोहालीच्या आय एस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळला जात आहे. टॉस जाणून टीम इंडियाने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताला चांगली सुरुवात मिळाली. रीझा हेंड्रिक्स 6 धावा करून दीपक चाहर याच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. दोन्ही संघातील पहिला सामना धर्मशाळा येथे खेळवला जाणार होता, मात्र पावसामुळे तो रद्द करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचा संघ मागील दोन दौऱ्यापासून टी-20 मालिकेत भारताला घरच्या मैदानावर पराभूत करीत आला आहे. त्यामुळे, यंदा टीम इंडिया विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली हा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत असेल. आजच्या मॅचमध्ये भारतीय गोलंदाजांनी तीन गडी बाद केले आहेत. (IND vs SA 2nd T20I: क्विंटन डी कॉक, तेम्बा बावुमा यांची शानदार फलंदाजी; टीम इंडियाला 150 धावांचे लक्ष्य)

भारताला दुसरे यश क्विंटन डी कॉक (Quninton de Kock) याच्या रूपात मिळाले. नवदीप सैनी (Navdeep Saini) याने दक्षिण आफ्रिकी कर्णधाराला 52 धावांवर बाद केले. डी कॉक सुरुवातीपासून घटक दिसत होता. त्याने सावध खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, सैनीच्या चेंडूवर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शानदार झेल टिपला आणि डी कॉकला माघारी धाडले. सैनीच्या दुसऱ्या ओव्हरच्या चेंडूवर डी कॉकने मोठा शॉट मारला. पण, तो बॅटवर बरोबर बसला नाही आणि कोहलीने डाईव्ह मारत कॅच घेतला. विराटने अगदी अखेरच्या क्षणात उडी मारत कॅच घेतला. या एका विकेटमुळे आफ्रिकेचा डाव 149 वर आटपला.. पहा याचा शानदार व्हिडिओ:

रवींद्र जडेजा याच्या या कॅचबद्दल काय म्हणाल?

पाच चेंडू नंतर जडेजाने अप्रतिम झेल घेतला आणि त्यासाठी ट्विटरवरून त्याला चाहत्यांकडून कौतुकाची थाप देखील मिळाली. रस्सी व्हॅन डेर ड्यूसेन याला बाद करण्यासाठी घेतलेलय झेलमुळे नेटिझन्सनी त्याला झेल पकड्यांचा "गुरु" म्हणून संबोधले. बऱ्याच  नेटिझन्सनी असा दावाही केला होता की कोहली कदाचित जडेजाकडून धडा घेत असेल.

जडेजाकडून पकडण्याचा धडा घेतो कोहली?

अद्भुत कॅच कॅप्टन पण जडेजाचे आभार

दुसरीकडे, 13 व्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजा याने रस्सी व्हॅन डर ड्यूसेन याला त्याच्याच चेंडूवर 1 धावांवर झेलबाद केले. दक्षिण आफ्रिकेने 13.3 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 15 व्या ओव्हरनंतर 3 विकेट गमावून 121 धावा केल्या आहेत. टेंभा बामुवा 47 आणि डेव्हिड मिलर 153 धावांवर खेळत आहेत.