भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना बुधवारी मोहालीमध्ये खेळला गेला. भारताने हा सामना सहजपणे सात गडी राखून जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. धर्मशाळा येथील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मॅचदरम्यान क्रिकेटच्या चाहत्यांनी सुरक्षा बंध तोडत मैदानात प्रवेश केला. मॅचदरम्यान असे दोनदा असे घडले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना जबरदस्ती मैदानाबाहेर काढले. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान टीम इंडियाच्या जर्सीमधील एका चाहत्याने मैदानात प्रवेश केला. त्यानंतर सुरक्षारक्षकाने त्याला बाहेर काढले, यादरम्यान रक्षकाला थोडी जबरदस्ती देखील करावी लागली. (IND vs SA 2nd T20I: विराट कोहली याने टिपला जबरदस्त झेल; चाहत्यांकडून ‘किंग कोहली’चे कौतुक, म्हणाले रवींद्र जडेजाकडून घेतोय ‘कॅचिंग लेसन’ (Video))
दुसरी घटना भारताच्या डावावेळी घडली, जेव्हा दुसर्या चाहत्याने विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी हातमिळवणी करण्यासाठी मैदानात धाव घेतली. चाहत्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पण, कोहली मागे-मागे जाताना दिसला. पण, परत एकदा सुरक्षारक्षकाने चपळता दाखवली आणि त्या चाहत्याला मैदानाबाहेर नेले. पहा 'हे' फोटोज:
कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने अर्धशतकी खेळी केली. यासह भारताने मालिके 1-0 अशी आघाडी मिळवली. टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 149 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात देखील चांगली झाली. पण, रोहित 12 धावा करत लगेचच बाद झाला. त्यानंतर आलेल्या कोहलीने धवनच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोघांनी मोठे शॉट्स खेळणे सुरु ठेवले. पण, असाच एक शॉट खेळण्याच्या नादात शिखर डेविड मिलर याच्या हाती झेल बाद झाला. मोहाली येथील मॅचमध्ये कर्णधार क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा यांनी आक्रमक फलंदाजी केली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघानं भारताला 150 धावांचे आव्हान दिले.