दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दिलेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत टीम इंडियाने 7 विकेट्स राखत विजय मिळवला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने अर्धशतकी खेळी केली तर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने 40 धावा करत भारतीय संघाचा डाव सावरला आणि विजयाच्या जवळ नेले. यासह भारताने मालिके 1-0 अशी आघाडी मिळवली. टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 149 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात देखील चांगली झाली. सलामीची जोडी रोहित शर्मा आणि धवन यांनी 33 धावांची भागीदारी केली. पण, रोहित 12 धावा करत लगेचच बाद झाला. रोहित सध्या खराब फॉर्मचा शिकार बनला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतदेखील रोहितला प्रभाव पडला आला नाही. (IND vs SA 2nd T20I: विराट कोहली याने टिपला जबरदस्त झेल; चाहत्यांकडून ‘किंग कोहली’चे कौतुक, म्हणाले रवींद्र जडेजाकडून घेतोय ‘कॅचिंग लेसन’ (Video))
त्यानंतर आलेल्या कोहलीने धवनच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोघांनी मोठे शॉट्स खेळणे सुरु ठेवले. पण, असाच एक शॉट खेळण्याच्या नादात शिखर डेविड मिलर याच्या हाती झेल बाद झाला. शिखरने 40 धावा केल्या. त्यानंतर रिषभ पंत (Rishabh Pant) याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण यंदाही त्याने सर्वांधी निराशा केली आणि केवळ 4 धावा केल्या. या नंतर कोहलीने श्रेयस अय्यर याच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला. अय्यरने 14 चेंडूत 16 धावा केल्या.
दरम्यान, मोहाली येथील मॅचमध्ये कर्णधार क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा यांनी आक्रमक फलंदाजी केली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघानं भारताला 150 धावांचे आव्हान दिले. टीम इंडियासाठी दीपक चहर याने दोन तर, नवदीप सैनी, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. टॉस जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दोन ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करता आली नाही आणि पहिल्या तीन ओव्हरमध्येच भारताने 31 धावा दिल्या.