रिषभ पंत आणि डेविड मिलर (Photo Credits: Twitter)

भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाचा युवा फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने त्याची निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली. मोहाली येथे खेळलेल्या मॅचमध्ये पंत काही प्रभाव पडू शकला नाही आणि फक्त 4 धावा करून माघारी परतला. एकीकडे पंतच्या खेळींकडू पाहून चाहत्यांची निराशा झाली तर दक्षिण आफ्रिकाई खेळाडू डेविड मिलर (David Miller( याने टिपलेला अप्रतिम कॅच पाहून पुन्हा उत्साहित झाली. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) चांगल्या लयीत असताना मिलरने सीमारेषेजवळ उत्कृष्ठ झेल घेतला आणि तो झेल पाहून सर्वांच्या तोंडाचे पाणीच पळाले. हा कॅच पाहून तर स्वतः कोहलीदेखील अवाक झाला. काही सेकंद कोणालाच कळले नाही काय झाले. शिखर धवन 40 धावांवर बाद झाला. मात्र मिलरने एका हाताने पकडलेलय या कॅचला चाहत्यांकडून 'कॅच ऑफ द इयर' असे देखील म्हटले जात आहे. (IND vs SA 2nd T20I: टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने विजय; विराट कोहली चे शानदार अर्धशतक)

पण, मिलरचे सुपर हिरो कामगिरी पंतला ट्रोल होण्यापासून वाचवू शकली नाही. पंत बाद होताच नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा त्याच्यावर निशाणा साधला आणि त्याच्या निष्काळजी खेळीसाठी त्याला फटकारले. दक्षिण आफ्रिकेच्या हातून विजय सरकत असताना मिलरने अगदी मोक्याच्या क्षणी धवनचा झेल टिपला. विराट कोहली आणि धवनने दुसर्‍या विकेटसाठी 60 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करुन भारताला विजयाच्या जवळ नेले. पन्नाशीच्या जवळ आलेल्या धवनने तबरेझ शमसी याचा चेंडू पार्कबाहेर पोहचवण्याच्या इराद्याने मोठा शॉट खेळाला. पण, मिडऑनवर उभ्या असलेल्या मिलरने हवेत उडी मारत बॉलला एका हाताने पकडले. मिलर सध्या जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. त्याने पुन्हा हे सिद्ध केले.

डेव्हिड मिलरचा एका हाती झेल

प्रेक्षक, मिलरचा दक्षिण आफ्रिकेचा सहकारी आणि कोहली आणि धवन दोघेही स्टेडियममधील प्रत्येकजण मिलरने पकडलेल्या कॅचपाहत आश्चर्य चकित राहिले. विराट आणि धवन एकमेकांकडे आश्चर्याने पाहत राहील, पण नंतर धवनला मैदान सोडावे लागले. या कॅचचा सोशल मीडियावर चाहते भर-भरून कौतुक करत आहे. पहा चाहत्यांच्या प्रतिक्रिया:

सीझन 2 चा कॅच

ते दोन ज्यांना रेट केले जाऊ शकत नाहीत

काय कॅच मिलर!!

एकीकडे, मिलरच्या कॅचने चाहते अवाक झाले तर रिषभ पंतने मात्र, चाहत्यांनी निराशा केली. पण, ज्याच्याकडे महेंद्र सिंह धोनी याचा उत्तराधिकारी म्हणून पहिले जाते त्याने चुकीचा शॉट मारून तबरेझ शम्सी याच्या हाती झेली बाद झाला.

निराश !!

फक्त पंत गोष्टी

रिषभ पंतच्या फलंदाजीचे तंत्र

चाहते ...