भारत वि, दक्षिण अफ्रीका (Photo Credits: Twitter)

South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team: भारत चार सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल. ज्यामध्ये भारत टी-20 मध्ये आपली विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी खेळणार आहे.  भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानचा पहिला सामना हा भारताने जिंकला असून 3 सामन्याच्या मालिकेत 1 - 0 ने  आघाडी घेतली आहे. आता उद्याच्या सामन्यात भारत हा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशिल असेल तर दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.  (हेही वाचा  -  India Beat South Africa, 1st T20I Match: पहिल्या सामन्यात भारताचा 61 धावांनी मोठा विजय, दक्षिण आफ्रिकेचा डाव 141 वर संपुष्टात )

प्रेक्षक भारत-दक्षिण आफ्रिका सामना विनामूल्य पाहू शकतील -

या मालिकेत टीम इंडिया चार सामने खेळणार आहे. स्पोर्ट्स 18 या टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहता येईल. जर प्रेक्षकांना दुसरा टी-20 सामना मोबाईलवर पाहायचा असेल तर तेही शक्य आहे. यासाठी तुम्हाला Jio Cinema ॲप डाउनलोड करावे लागेल. येथे तुम्ही सामना विनामूल्य पाहू शकता.

दुसऱ्या T20 दरम्यान हवामान कसे असेल?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्याच्या दिवशी हवामान थंड राहू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तापमान 16 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होण्याची शक्यता नगण्य आहे.

संजूचे धमाकेदार शतक -

भारताने टी-20 मालिकेतील पहिला सामना 61 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात संजू सॅमसनने धमाकेदार शतक झळकावले. त्याने 50 चेंडूंचा सामना करत 107 धावा केल्या. सॅमसनच्या या खेळीत 10 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. टिळक वर्माने 18 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. अशा प्रकारे भारताने 202 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 141 धावा करून सर्वबाद झाला.