IND vs SA 2020: टीम इंडियावर 'कोरोना'चे संकट, भुवनेश्वर कुमार म्हणाला-'थुक लावून चेंडू चमकावणार नाही'
(Image Credit: AP/PTI Photo)

भारतीय संघ (Indian Team) दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. गुरुवारी टीम सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना धर्मशालामध्ये (Dharmasala) रंगणार आहे. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे काही काळ भारतीय संघातून बाहेर राहिल्यावर भुवनेश्वर संघात परतला आहे. भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) गुरुवारी सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. भुवी कोरोना वायरस लक्षात घेऊन सामन्यादरम्यान सावधगिरी बाळगण्या विषयी बोलला. भारतात या विषाणूमुळे कोणतीही सामना पुढे ढकलण्यात किंवा रद्द करण्यात आला नसला तरी खेळाडूंमध्ये याची नक्कीच भीती आहे. टीम इंडियामध्ये परतलेल्या भुवनेश्वरने धर्मशाला वनडेआधी कोरोना विषाणूचा गंभीर प्रश्न म्हटले. भुवनेश्वर म्हणाला की, गुरुवारी पहिल्या वनडे सामन्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तो खबरदारी घेईल. (IPL 2020: बेंगळुरूमध्ये नाही होणार आयपीएलचे सामने? कर्नाटक सरकारने केंद्र सरकारला टूर्नामेंट रद्द करण्यासाठी लिहिले पत्र, जाणून घ्या काय आहे महाराष्ट्राचे मत)

भुवी म्हणाले की, “आम्ही विचार केला आहे की आम्ही थुंक लावून चेंडू चमकवणार नाही. जर थुकीचा वापर बॉल चमकविण्यासाठी केला गेला नाही तर तिची चमक कायम राखण्यासाठी काय केले जाईल याबाबत आत्ता काही म्हणू शकत नाही. जर आमच्या गोलंदाजीवर विरोधी खेळाडूंनी आमची धुलाई केली तर आपण म्हणाल की आम्ही चांगली गोलंदाजी करत नाही." तो म्हणाला की, टीमच्या बैठकीत जे काही करण्याचा सल्ला दिला जाईल तो ते सर्व पाळतील. भुवीने कोरोनामुळे होणारा धोका मोठा मानला आणि म्हणाला की, "तुम्ही सध्या काहीही बोलू शकत नाही कारण यामुळे भारतातही एक अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही याबद्दल बचाव उपाय करत आहोत. आमच्यासोबत टीम डॉक्टर आहेत, ते आम्हाला काय करावे, काय करू नये आणि धोका टाळण्याची आवश्यकता आहे ते सांगतात."

दरम्यान, सध्या भारतात कोरोना व्हायरसचे 50 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. हिमाचलमध्येही कोरोना विषाणूची 3 संशयित आढळले आहेत. टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलही कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेत आहे. दिल्लीहून धर्मशालासाठी निघण्यापूर्वी चहलने त्याच्या तोंडावर मास्क लावला होता.