(Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी मैदानावर असे काहीतरी घडले की सर्वांनाच आश्चर्य वाटले. एक फॅन मॅच सुरु असताना सुरक्षा कोंडी तोडत त्याने प्रथम मैदानात प्रवेश केला आणि त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma0 याच्या पाया पडला. आणि नंतर झाले असे की त्या चाहत्याला थांबवण्याच्या प्रयत्नात स्वतः रोहितचा तोल गेला आणि तो मैदानावरच पडला. लवकरच सुरक्षा रक्षक मैदानामध्ये आहे आणि त्यांनी त्या चाहत्यास जबरदस्ती बाहेर काढले, पण त्याआधी फॅन आणि रोहित यांच्यात जे झाले ज्यामुळे अगदी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajiknya Rahane) यालादेखील हसू अनावर झाले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या सुरक्षेत खळबळ उडाल्यानंतर चाहत्यांनी त्यावेळी स्लिपवर क्षेत्ररक्षण करणार्‍या रोहितकडे थेट जाऊन त्याच्या पायाला स्पर्श केला. (IND vs SA 2nd Test Day 3: विराट कोहली, रिद्धिमान साहा यांनी मैदानात दाखवली जबरदार स्फूर्ती; झेलले अप्रतिम कॅच, पहा (Video))

या प्रसंगाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेनुरन मुथुसामीला बाद झाल्यानंतर वर्नोन फिलेंडर मैदानात उतरलेल्या वेळेची ही घटना आहे. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या मालिकेदरम्यानची ही तिसरी घटना आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान एका चाहत्याने मैदानात घुसून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी हातमिळवणी केली होती. इतकेच नाही तर त्या चाहत्याने कोहलीसोबत सेल्फी घेण्याचाही प्रयत्न केला होता. अशा घटनांमुळे क्षेत्रीय सुरक्षा कर्मचार्‍यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

प्राउड ऑफ यू थलाइवा

दुसर्‍या कसोटी सामन्यात भारत सध्या मजबूत स्थितीत आहे. भारताने पहिला डाव पाच विकेटसाठी 601 धावांवर घोषित केला होता, त्याउलट दक्षिण आफ्रिकेने तिसर्‍या दिवसाच्या ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेला 197 धावांत 8 गडी गमावले. आणि आता, आफ्रिकेचे दोन गडी बाकी आहे, पण भारतीय गोलंदाज त्यांना आऊट करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.