IND vs SA 2019: टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; हार्दिक पंड्या याचे पुनरागमन, एमएस धोनी आणि जसप्रीत बुमराह यांना वगळले
एमएस धोनी

दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध आगामी टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ (Indian Team) जाहीर केला आहे. 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडियामधून माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना वगळण्यात आले आहे.  तर, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आलेल्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला संघात स्थान दिले आहे. उर्वरित विंडीज दौऱ्यावरील संघाचा टी-20 सामन्यात सामिल झालेला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, धोनीने स्वत: या दौऱ्यातून माघार घेतली आहे आणि त्यामुळे त्याला या मालिकेसाठी संघात जागा मिळाली नाही. परिणामी पुन्हा एकदा, रिषभ पंत याच्याकडे विकेटकिपींगची जबाबदारी देण्यात आली आहे. धोनीने वेस्ट इंडिज दौऱ्यातूनही विश्रांती घेतली होती. (IND vs SA 2019: टी-20 मालिकेसाठी लांस क्लूजनर यांची दक्षिण आफ्रिका संघाच्या सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती)

दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. आभारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. धोनीला संघात जागा दिलेली नाही. त्यामुळे, पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत धोनी खेळणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले आहेत. आयसीसी क्रिकेट विश्वचषकमध्ये धोनीला त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. तसेच, तो विश्वचषकनंतर निवृत्ती घेरणार असे बोलले जात होते. पण, आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक पर्यंत धोनी खेळात राहील असे वृत्त समोर येत होते. पण, धोनीने स्वतः अद्याप याबाबद कोणतेही भाष्य केले नाही.

3 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दिपक चहर आणि नवदीप सैनी.