IND vs SA 2019: टी-20 मालिकेसाठी लांस क्लूजनर यांची दक्षिण आफ्रिका संघाच्या सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती
लांस क्लूजनर (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) भारतीय (India) दौऱ्याला सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची टी-20 मालिका आणि टेस्ट मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू लांस क्लूजनर (Lance Klusener) यांची सप्टेंबरमध्ये भारत विरुद्ध तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेसाठी शुक्रवारी राष्ट्रीय संघाचा सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर माजी वेगवान गोलंदाज व्हिन्सेंट बार्न्स (Vincent Barnes) याला सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहेत. जस्टीन ऑन्टाँग (Justin Ontong) सहाय्यक क्षेत्ररक्षण प्रशिक्षकच्या पदावर कायम राहतील.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे कार्यकारी संचालक कोरे फॉन जिल म्हणाले की, “नवीन संघसंरचना अंतर्गत संघ संचालकांनी तीन सहाय्यक प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे जे तीन वेगवेगळ्या विषयात गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्यात माहिर आहे."

क्लुजनरने कसोटी सामन्यात 1906 धावा केल्या आणि 80 विकेट्स देखील घेतले. त्याचबरोबर वनडे सामन्यात 3576 धावा करत त्याने 192 गडी बाद केले आहेत. दुसरीकडे, बार्नेस 2003 ते 2011 कालावधीत संघाचे गोलंदाजी आणि नंतर सहायक प्रशिक्षक होते. शिवाय, ऑन्टाँग ही दीर्घकाळापासून संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यात दोन्ही संघ पहिले टी-२० मालिकेत आमने सामने असतील.