दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचसाठी टीम इंडियाने प्लेयिंग इलेव्हनची घोषणा केली आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) याला डच्चू देत अनुभवी विकेटकीपर-फलंदाज रिद्धिमान साहा याला संधी मिळाली आहे तर, रवींचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचादेखील समावेश केला गेला आहे. साहा, अश्विन आणि जडेजाला यापूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळत आले नाही, तर पंत मिळालेल्या संधींचा उपयोग करू शकला नाही आणि प्रत्येक वेळी निराश केले. सराव सामन्यात अपयशी ठरलेल असला तरी रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सलामीवीर म्हणून मैदानात पाऊल ठेवेल. केएल राहुल (KL Rahul) याच्या सतत अपयशामुळे रोहितला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळाले आहेत. विशाखापट्टणम येथे 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मॅचपूर्वी प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेदेखील रोहितविषयी विचारलेल्या प्रश्नाला उघडपणे उत्तर दिले. (IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रिद्धिमान साहा करणार विकेटकीपिंग, पहिल्या टेस्टमध्ये रिषभ पंत टीम इंडियातुन याला वगळले)
पहिल्या मॅचपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना विराटला विचारले की संघ व्यवस्थान रोहितला पाच की सहा कसोटी सामने खेळवेल का? यावर विराटने सांगितले की त्यांना रोहितबद्दल कोणतीही घाई नाही. कसोटी योजनांमध्ये सामील होण्यासाठी रोहितला पुरेसा वेळ दिला जाईल. कोहली म्हणाला, "तुम्ही भारतात खेळण्यासाठी वेगळी रणनीती बनवतात आणि परदेशातही ती वेगळी असते. ओपनिंग ही अशी जागा आहे जिथे आपल्याला आपला खेळ समजण्यासाठी फलंदाजास वेळ द्यावा लागतो." विराट म्हणाला की, रोहितला नव्या भूमिकेत बघण्यासाठी तो फार उत्सुक आहे. विराटने रोहितची तुलना माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्याशी केली. सुरुवातीच्या काळात सेहवागदेखील टेस्टमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करायचे. कोहली म्हणाला, "सेहवागला आक्रमक फलंदाजी करताना कोणी लंचच्या आधी शतक ठोकण्यास सांगितले होते असे नाही, परंतु हा त्यांचा नैसर्गिक खेळ होता. एकवेळी आपला खेळ समजून ते खेळायचे आणि गोलंदाजांची धुलाई करायचे. रोहितकडे नक्कीच अशी क्षमता आहे. जर खेळपट्टी आव्हानात्मक असेल तर अशा परिस्थितीत काय करावे ते त्यांना चांगलेच ठाऊक आहे."
कोहलीने हे देखील उघडकीस केले की, रोहितकडून ओपनिंग कारवायचा निर्णय खूप आधी घेतला होता, पण राहुलच्या बाहेर पडल्यानंतर सध्याच्या परिस्थितीतच याची अंमलबजावणी होऊ शकली. रोहित शर्मा वेस्ट इंडीज दौर्यावर टीम इंडियाचा भाग होता, परंतु कसोटी संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळाले नव्हते. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित मधल्या फळीत खेळत आहे आणि 27 कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी 39.62 आहे. रोहित आपल्या नव्या भूमिकेत कसा फलंदाजी करतो हे पाहणे सर्वासाठी उत्साही असेल.