IND vs SA 1st Test Day 3: विराट कोहली याच्या 'या' Master Plan' ने इशांत शर्मा ला मिळवून दिली टेंबा बावुमा याची विकेट (Video)
विराट कोहली, इशांत शर्मा (Photo Credit: Getty)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण, दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी त्याने या क्षणी तो जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार का आहे, हे सिद्ध करून दाखवले. विशाखापट्टणम येथे भारत (India) आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी कोहली क्षेत्ररक्षण करताना कर्णधाराच्या सर्वोत्तम भूमिकेत होता. मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांच्या तिहेरी शतकाच्या भागीदारीमुळे भारताने पहिल्या डावात 7 बाद 502 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी आफ्रिकेचे तीन विकेट घेतल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत संघाचा सर्वात घातक फलंदाज टेंबा बावुमा (Temba Bavuma) खेळत होता. (IND vs SA 1st Test Day 3:  डीन एल्गार याचे संघर्षपूर्ण शतक; टेस्ट कारकिर्दीतला 12 वे, टीम इंडियाविरुद्ध पहिले)

तिसऱ्या दिवशी इशांत शर्मा (Ishant Sharma) याने गोलंदाजीची सुरुवात केली. आणि विराटने सुरुवातीलाच इशांतच्या मदतीस आला धोकादायक बावुमाची विकेट मिळविण्यात मदत केली. इशांत आक्रमक गोलंदाजी करत होता आणि पहिल्या ओव्हरमधील चार चेंडू बावुमाला ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकले, पण याने बावुमला काही त्रास झाला नाही. पुढचाच चेंडू त्याने बाहेरच्या स्टंपकडे टाकला, जो की त्याच्या बॅक पॅडवरला आणि अंपायरने निर्णय भारताच्या बाजूने दिला. यानंतर बावुमने पुनरावलोकन केले नाही आणि 18 च्या स्कोरवर बाद झाला. नंतर, रिप्लेमध्ये पाहायला मिळाले की कोहलीने चेंडू टाकण्याच्या अगदी आधी इशांतला बाहेरच्या स्टम्पवरुन चेंडू टाकण्याचा सल्ला देत होता.

दुर्दैवाने, तिसर्‍या दिवशी पहिल्या सत्रामध्ये हा भारताचा एकमेव यशस्वी क्षण राहिला. त्यानंतर, डीन एल्गार (Dean Elgar) आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) यांनी शतकी भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. यादरम्यान, एल्गारने शतक पूर्ण केले तर डु प्लेसिसने देखील अर्धशतकी खेळी केली. डु प्लेसिस 55 धावा करून रविचंद्रन अश्विन याच्या चेंडूवर झेल बाद झाला. आफ्रिकी संघ सध्या भारताच्या 264 धावा मागे आहे. आणि एल्गारसह क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) नाबाद खेळत आहे. डी कॉकने फलंदाजीसाठी येताच आक्रमक सुरुवात केली आणि काही मोठे शॉट्स लगावले.