रवींद्र जडेजा (Photo Credit: AP/PTI)

टीम इंडियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची सर्वात जास्त अचूक गोलंदाजांपैकी मोजला जातो, परंतु कधीकधी एक चांगला गोलंदाजदेखील अन्यायकारक चुका करतो. विशाखापट्टणम टेस्टच्या तिसर्‍या दिवशी जडेजाने एक चेंडू फेकला ज्याच्यामुळे सोशल मीडियावर चाहते त्याची चेष्टा करत आहेत. जडेजाच्या या चेंडूला क्रिकेटमधील सर्वात वाईट बॉल म्हटले जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) डावातील 39 व्या षटकात जडेजाने सर्वात वाईट चेंडू टाकला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जडेजा राउंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी आला आणि चेंडू त्याच्या हातातून सुटला. जडेजाने त्याच्या पायाजवळ चेंडू फेकला आणि बरेच टप्पे खात तो ती विकेटकीपर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याच्याकडे गेला. (IND vs SA 1st Test Day 3: रवींद्र जडेजा याची धमाकेदार खेळी; जावगल श्रीनाथ, इशांत शर्मा सह 'या' यादीत झाला समावेश)

जडेजाचा या प्रकारची गोलंदाजी पाहत तो स्वतः हसला, संघातील अन्य खेळाडू आणि चेंडूचा सामना करणार्‍या फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) याला देखील त्याच्या हसू अनावर झाले. आणि अखेरीस अंपायरने जडेजाच्या चेंडूला नो बॉल म्हटले. रविंद्रने असा चेंडू टाकण्याची ही पहिली वेळ नाही. 2016 मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ भारत दौर्‍यावर आला होता तेव्हा जडेजाच्या हातून चेंडू अशाच प्रकारे सुटला होता. अंपायरनेही या चेंडूला नो बॉल म्हटले होते. सोशल मीडियावर जडेजाच्या 'या' चेंडूवर चाहते त्याची फिरकी घेत आहेत. पहा सोशल मीडियावरील प्रतिक्रिया: 

 

View this post on Instagram

 

2016-2019 😂

A post shared by cricket.heaven.2 (@cricket.heaven.2) on

वेडा जडेजा

विशाखापट्टणम कसोटीबद्दल बोलले तर रवींद्रने शानदार गोलंदाजी केली आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये 200 गडी बाद करणारा जडेजा हा दहावा भारतीय गोलंदाज आहे. जडेजाने आपल्या 44 व्या कसोटी सामन्यात हा पराक्रम केला. जडेजाने डेन पायटेड (Dane Piedt) आणि डीन एल्गार (Dean Elgar) यांची विकेट घेत 200 टेस्ट विकेट्सचा टप्पा गाठला.