IND vs SA 1st Test Day 2: रोहित शर्मा, मयंक अग्रवाल यांचे तिहेरी शतक; टीम इंडियाचा पहिला डाव 502/7 धावांवर घोषित
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघ (Photo Credit: Getty)

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agrawl) यांच्या जोडीने दक्षिण आफ्रिके (South Africa) विरूद्ध पहिल्या विकेटसाठी विक्रमी 317 धावांची नोंद करुन इतिहास रचला. रोहित आणि मयंकने पहिल्या विकेटसाठी तिहेरी शतकांची भागीदारी केली. टीम इंडियाच्या दोन्ही सलामी जोडीने 317 धावांची भागीदारी केली आणि अनेक रेकॉर्डस् ला गवसणी घातली. रोहितने 176 तर मयंकने 215 धावा केल्या आणि संघाला आफ्रिकाविरुद्ध आघाडी मिळवण्यास सहाय्य केले. भारताने आपला पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी रोहितने आपले शतक पूर्ण केले होते तर मयंकने देखील अर्धशतक केले होते. पहिल्या दिवशी तिसऱ्या सेशनपर्यंत भारताने एकही विकेट गमावली नव्हती. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ लवकर संपवण्यात आला. त्यानंतर रोहित आणि मयंकने दुसऱ्या दिवशी शानदार खेळी केली आणि रेकॉर्ड भागी रचली.  (IND vs SA 1st Test Day 2: रोहित शर्मा याने केली ऐतिहासिक खेळी; विराट कोहली याने केले असे काही ज्याने चाहते झाले खुश Video)

दुसऱ्या दिवशी रोहितने दीडशे धावांचा टप्पा गाठला. टेस्टमध्ये पहिल्यांदा सलामीला आलेल्या रोहितकडून दुहेरी शतकाची अपेक्षा होती. पण, केशव महाराज याच्या गोलंदाजीवर रोहित झेल बाद झाला. त्यानंतर मयंकने दीडशेचा टप्पा गाठला. रोहित बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा मैदानावर आला आणि फक्त 6 धावांवर बाद झाला. नंतर, कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी आला. वेस्ट इंडिजविरुद्धसारखी खेळी करण्याची विराटकडून अपेक्षा होती, पण यंदा तो पहिल्या डावात फक्त 20 धावच करू शकला आणि माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणे देखील काही खास करू शकला नाही आणि 15 धावांवर बाद झाला.

रवींद्र जडेजा, हनुमा विहारी आणि रिद्धिमान साहा यांनी आपल्या परीने छोटे योगदान दिले. विहारीने 10 धावा केल्या, 2018 नंतर पहिला टेस्ट सामना खेळत असलेल्या साहाने 21 धावा केल्या. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकाकडून केशव महाराज याने 3 गडी बाद केले. केशवने रोहित, रहाणे आणि विहारी यांसारख्या टेस्ट मोठ्या खेळाडूंची विकेट घेतली. डील एल्गार याने मयंकची विकेट घेतली आणि संघाला मोठे यश मिळवले. मयंकच्या बाद झाल्यावर अन्य भारतीय फलंदाज मोठे शॉट्स मारण्याच्या नादाद बाद झाले. वर्नोन फिलैंडर याने पुजाराला माघारी धाडले आणि डेन पायड याने साहाला बाद केले.