IND vs SA 1st Test 2019: पहिल्या टेस्टआधी विराट कोहली ने घेतली खास चाहत्यांची भेट, अंगावर गोंदवले कोहलीसंबंधीचे 15 टॅटू
विराट कोहली, पिंटूराज (Photo Credit: PTI)

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या टेस्ट मॅचआधी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या एका खास चाहत्यांची भेट घेतली. विझाग (Vizag) स्टेडियमवर विराटने पिंटू (Pintu) नावाच्या एका चाहत्याला भेट देत दिली आणि आनंदाने मिठी मारली. आश्चर्य म्हणजे, पिंटूने त्याच्या शरीरावर कोहली संबंधीचे 10 हून अधिक टॅटू काढले आहेत. विराटनेसुद्धा त्याच्या शरीरावर बनविलेले अनेक टॅटू बनवले आहेत, पण या सुपर फॅनला भेटताच कोहलीलाही अश्रू अनावर झाले. या चाहत्याने त्याच्या शरीरावर विराटचा फोटो, त्याचे रेकॉर्डस्, प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचा फोटो आणि सचिन तेंडुलकर याचा फोटो देखील या चाहत्याने शरीरावर गोलंदवलेला आहे. पिंटू आणि विराटच्या या खास भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे. (IND vs SA 1st Test: विराट कोहली ने केली सौरव गांगुली च्या 'या' रेकॉर्ड ची बरोबरी; दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एमएस धोनी, सचिन तेंडुलकर सह या यादीत झाला समावेश)

पिंटू हा ओडिशाचा असून तो अगदी माफक उत्पन्न गटातील कुटुंबातील आहे. भारतात होत असलेला टीम इंडियाचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी तो स्टेडियमला भेट देतो. आणि विजागमध्ये प्रथमच पिंटूला विराटला भेटण्याची संधी मिळाली. पिंटूने त्याच्या पाठीवर विराटचा जर्सी क्रमांक 18 पासून 2008 अंडर -19 विश्वचषक जिंकणारा विराट, अर्जुन पुरस्कार, या सर्वांवर पिंटूने टॅटू गोंदवले आहेत. पिंटूचे स्वप्न कोहलीला भेटण्याचे होते आणि आता ते पूर्ण झाले आहे. सामन्यापूर्वी 1 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेत विराटने पिंटुराजची भेट घेतली. पिंटूने या टॅटूबाबतचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. पहा हे फोटोज:

पिंटूचा व्हिडिओ

विराट कोहलीच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकाविरूद्ध विझागमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्रात पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी भारताची नवीन सलामीची जोडी रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी द्विशतकी भागीदारी केली होती. पहिल्या दिवसाखेर रोहितने 115 धावा, तर मयंकने 84 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता 202 केल्या होत्या.