रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

वनडे आणि टी-20 नंतर टेस्ट सामन्यात सलामीला फलंदाजीला येत 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) याने चाहते आणि संघाला निराश केले नाही. सलामी फलंदाज म्हणून पहिल्याच मॅचमध्ये रोहितने शतक केले आणि मयंक अग्रवाल याच्यासाठीने टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेले. दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये सर्वांच्या नजरा रोहितवर होत्या. वनडे आणि टी-20 मध्ये सलामीला फलंदाजी करायला आलेल्या रोहितला पहिल्यांदा टेस्टमध्ये सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. रोहितने मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेतला आणि टेस्टमधील 11 वे, तर सलामी फलंदाज म्हणून पहिले शतक केले. यादरम्यान, याला एक निव्वळ योगायोग म्हणावा की आजच्याच दिवशी रोहितने टी-20 मधील त्याचे पहिले शतक केले होते आणि ते ही दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच. होय, आश्चर्याची बाब आहे पण योग्य आहे. (IND vs SA 1st Test Day 1: रोहित शर्मा-मयंक अग्रवाल यांची द्विशतकी भागीदारी; पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, भारताचा स्कोर 202/0)

2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यादरम्यान पहिल्या टी-20 मॅचमध्ये रोहितने पहिले शतक केले आणि सुरेश रैना यांच्यानंतर टी-20 मध्ये शतक करणारा दुसरा भारतीय (India) फलंदाज बनला. 2015 च्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये पहिले फलंदाजी करत भारताने दक्षिण आफ्रिकेला 200 धावांचे आव्हान दिले होते. यात, रोहितने 106 धावा केल्या होत्या, पण ते संघाला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण पडले नाही आणि टीम इंडियाला 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला.

दुसरीकडे, रोहित 5 व्या किंवा 6 व्या क्रमांकावर टेस्ट संघात फलंदाजी करायला यायचा. पण, यात त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर, केएल राहुल याच्या सतत निराशाजनक खेळीनंतर अखेरीस रोहितला सलामीला फलंदाजी करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 202 धावा केल्या. रोहितने 115 आणि मयंकने 84 धावा केल्या आहेत. लंचपर्यंत रोहितने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर मयंकने देखील चौथे अर्धशतक केले. अखेरीस रोहितने 84 चेंडूंत सेनुरन मुथुसामी याच्या गोलंदाजीवर चौकारासह 11 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्याचा स्वीप शॉट विश्वासार्ह नव्हता परंतु तो भाग्यवान होता की फिल्डर झेल घेण्यासाठी चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही.