मागील वेळी भारताने (India) दक्षिण आफ्रिके (South Africa) विरूद्ध घरातील एकदिवसीय मालिका 2015 मध्ये खेळली होती आणि दोन्ही टीममध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली, मात्र अखेरीस आफ्रिकी संघाने वर्चस्व राखत 3-2 ने मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा संघ आता संक्रमणाच्या अवस्थेत आहे आणि चार वर्षांपूर्वी भारताविरुद्ध मालिकेच्या प्रसिद्ध विजयात भाग घेतलेले बरेच खेळाडू आता आफ्रिकेच्या सेट अपमध्ये नाहीत. मात्र, क्विंटन डी कॉकच्या नेतृत्वातील संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या उत्स्फुर्त कामगिरीनंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल.तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतासमोर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. मालिकेचा पहिला सामना 12 मार्च रोजी धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियम (HPCA Stadium) मध्ये खेळला जाईल. ही मालिका भारताच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे, कारण त्यांना न्यूझीलंडविरुद्ध नुकतंच 3-0 च्या क्लीन स्वीपचा सामना करावा लागला आहे. (IND vs SA ODI 2020: दक्षिण आफ्रिकेचे 'हे' 3 खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतात घातक, रहावे लागणार सावध)
सामना धर्मशालामध्ये होणार आहे आणि येथे पासून पुन्हा एकदा मॅचमध्ये अडथळा घालणार असे दिसत आहे. गुरुवारी धरमशालामधील हवामान अंदाज उत्तम नाही. आर्द्रता उच्च बाजूला असून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता 100 टक्के आहे. जर दिवसाच्या बर्यापैकी जोरदार पाऊस पडत असेल तर कदाचित खेळ रद्द केला जाऊ शकतो. शिवाय, दिवसभरात थंडीही जाणवेल. किमान आणि कमाल तपमान अनुक्रमे 7 अंश आणि 11 अंश सेल्सिअस राहील.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सध्याची कामगिरी चांगली आहे. या महिन्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्लीन स्वीप केले, तर इंग्लंडविरुद्ध मालिका ड्रॉ झाली. तर भारताला न्यूझीलंड दौऱ्यावर क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते. पण हार्दिक पांड्या, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरले असून आफ्रिकेविरूद्ध पुनरागमन करीत आहेत, हे भारतीय संघासाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकातील पहिला सामना 12 मार्च रोजी धर्मशाला तर दुसरा सामना 15 मार्चला लखनऊमध्ये खेळला जाईल. मालिकेचा शेवटचा सामना 18 मार्च रोजी कोलकाता येथे खेळला जाईल.