भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात रंगणारा कोणताही सामना उत्कंटावर्धकच. मग तो खेळ, राजकारण, एकूण देशाचा विकासदर असो की युद्ध. एकेकाळी एकाच भूखंडाचा भाग असलेले हे दोन्ही देश आज एकमेकांसमोर आव्हान प्रतिआव्हान देत उभे ठाकतात. आजही हे दोन्ही संघ सायंकाळी 07.30 वाजता दुबई येथील अंतरराष्ट्रीय स्टेडियम (Dubai International Stadium) पुन्हा एकदा उत्साह, उत्कंटा आणि संघर्ष वाढवत एकमेकांसमोर उभे ठाकतील. दोन्हीपैकी जो देश बाजी मारेल त्या देशाचे टी ट्वेंटी वर्ल्ड कप ( T20 World Cup) जिंकण्याच्या संधी वाढणार आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप (India vs Pakistan T20 World Cup) सामन्यात कोण बाजी मारते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
आयसीसी वनडे आणि टी-20 कपसाठी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यांबद्दल बोलायचे तर, वर्ल्डकप साठी म्हणून खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये पाकिस्तान भारताकडून पराभूतच झाला आहे. आतापर्यं भारताने पाकिस्तानला महत्त्वाच्या 12 सामन्यांमध्ये धूळ चारली आहे. टी 20 विश्वचषक 2007 मध्ये सुरु झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला पाच वेळा पराभूत केले आहे. त्यामुळे याही वेळा इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, India vs Pakistan, ICC T20 World Cup 2021: भारत- पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे काही तासातच संपली!)
भारत-पाकिस्तान टी-20 संघ
भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, ईशान किशन, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर.
पाकिस्तान: बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, फखर जमां, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, हैदर अली.