IND vs PAK, ICC World Cup 2019: सामन्यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद झाला बोअर, जांभया देतानाचे फोटो व्हायरल
(Image Credit: ICC Video Screenshot)

पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमद (Sarfraz Ahmed) भारत (India) विरुद्ध मॅचदरम्यान कॅमेरा ने आळस देताना पकडले. ही घटना पावसाच्या दरम्यानच्या ब्रेकनंतर झाली. भारत-पाक (Pakistan) सामना 46.4 ओव्हर्स नंतर पावसामुळे थांबवण्यात आला होता आणि ब्रेक जवळजवळ अर्धा तास चालला. सर्फराजचा जांभया देतानाच फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झाला असून त्याला त्याच्या या वर्तवणुकीसाठी त्याला ट्रोल ही केले जात आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: आऊट नसतानाही विराट कोहलीने सोडले मैदान, भडकले फैंस)

जेव्हा आपल्याला इतक्या चांगल्या हवामानात चहा आणि पक्कोडा हवा असतो पण सामना संपलेला नसतो

जेव्हा आपणास सामन्याचा परिणाम माहित असतो परंतु सामना खेळणे अनिवार्य आहे

वाटतं तो... झोपेतून उठून, तोंड ने धुताच आला आहे...

दरम्यान आजच्या सामन्यात भारतीय उप-कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने केवळ तीन षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 113 चेंडूंचा खेळात 140 धावा केल्या आणि 24 व्या शतकाची नोंद केली. शर्मा व्यतिरिक्त कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने ही आपले 51 वे अर्धशतक पूर्ण केले आणि 65 चेंडूंत 77 धावा केल्या.