10 जुलै 2019 आजची ही तारीख भारतीय क्रिकेट चाहता कदाचितच विसरू शकेल. 2019 वर्ल्ड कपमधील (World Cup) पहिला सेमीफायनल सामना 9 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये सुरू झाला, ज्याचा निकाल 10 जुलैला लागला. पावसामुळे सामना राखीव दिवशी पूर्ण झाला आणि अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) भारताला (India) 18 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्या सामन्यात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 59 चेंडूंत 77 धावा केल्या होत्या, पण टीमला विजय मिळवून देण्यासाठी त्या पुरेशा नव्हत्या. या दिवसाचा फोटो शेअर करताना जडेजाने या दिवसाचे वर्णन आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवसांपैकी एक केले आहे. भारतीय टीमने 92 धावांवर 6 विकेट गमावल्यावर जडेजाने एमएस धोनीच्या साथीने डाव सर्वाला आणि टीमला विजयाच्या जवळ नेले. पण, जडेजा बाद झाल्यावर आणि धोनीच्या रनआऊटने टीम इंडिया आणि चाहत्यांना दुःख अनावर झाले. (On This Day in 2019: आजच्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलमधील पराभवाने झाले कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न भंग)
या सामन्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना जडेजाने लिहिले की, "आम्ही प्रयत्न केला पण आम्ही कमी पडलो. सर्वात वाईट दिवसांपैकी एक." अशा प्रकारे महेंद्र सिंह धोनीला आंतरराष्ट्रीय सामने खेळून एक वर्ष पूर्ण झाला आहे. या सामन्यात धोनी 72 चेंडूत 50 धावा करून धावबाद झाला. धोनीच्या रनआऊटने सामना बदलून टाकला. जर धोनी खेळपट्टीवर टिकला असता तर कदाचित निकाल काही दुसरा लागला असता. या सामन्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देईल अशी चर्चा सुरू झाली, मात्र धोनीने स्वत: याविषयी कोणतेही विधान केलेले नाही.
We try our best but still fall short sometimes 😔
One of the saddest days! #oneyearagotoday pic.twitter.com/1U3N3VYyYj
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) July 10, 2020
न्यूझीलंडने 50 षटकांत 8 विकेट्सवर 239 धावा केल्या होत्या, आणि टीम इंडिया हा सामना सहज जिंकेलअसं वाटत होतं. पावसामुळे टीम इंडियाला राखीव दिवशी फलंदाजीची संधी मिळाली. भारताचे तीनही आघाडीचे फलंदाज-रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी किवी गोलंदाजांनी फक्त 1 च्या वैयक्तिक धावसंख्येवर माघारी घडले. अशाप्रकारे भारताने 5 धावांवर 3 विकेट गमावल्या. त्यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या प्रत्येकी 32 धावा करून बाद झाले. धोनी आणि जडेजाने भारताला सामन्यात पुनरागमन करून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण धोनी धावबाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या विजयाच्या आशादेखील संपुष्टात आल्या.