भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) आयसीसी (ICC) विश्वचषक सेमीफायनल सामना पावसामुळं थांबवण्यात आला आहे. पावसामुळे आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड खेळ रद्द झाला तर उद्याचा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 46 ओव्हरनंतर न्यूझीलंडने 5 बाद 209 धावा केल्या आहेत. भारतासमोर असू शकते 240 धावांचे आव्हान. त्यामुळे जर पाऊस काही वेळाने थांबला तर टीम इंडियासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार 4 ओव्हर कमी होणार आहेत. तसेच, जर सामना 20 षटकांचा झाला तर भारतासमोर 148 धावांचे आव्हान असणार आहे.
न्यूझीलंडने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडची फलंदाजांची केविलवाणी अवस्था केली. यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने सलामीवीर मार्टिन गुप्टिल (Martin Guptill) याला बाद करत पहिले यश मिळवून दिले. गुप्टिल 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने हेन्री निकोलस (Henry Nicholls) ला 28 धावांवर बाद केले. युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) याने कर्णधार केन विल्यम्सन (Kane Williamson) ला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह याची अद्वितीय कामगिरी, जोफ्रा आर्चर लाही टाकले मागे)
दुसरीकडे, 16व्या ओव्हरमध्ये भारताला मोठा धक्का बसला. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ला गोलंदाजी करताना पायाचे स्नायू दुखावल्यानं मैदान सोडावं लागलं होते. पण काही वेळात तो मैदावर परतला आणि मोक्याच्या क्षणी जेम्स निशाम (James Neesham) ची विकेट घेतली.
दरम्यान भारत-न्यूझीलंड यांचा यंदाच्या वर्ल्ड कपमधला हा पहिला सामना आहे. साखळी फेरीतील सामना पावासामुळं रद्द झाला होता. दरम्यान, मँचेस्टरची मॅच भारत जिंकणार की न्यूझीलंड यावर आता 1500 कोटींची सट्टा देखील लागला आहे. फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माच्या शतकावर देखील सट्टा लागला आहे.