IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह याची अद्वितीय कामगिरी, जोफ्रा आर्चर लाही टाकले मागे
दरम्यान, बुमराह ने या सामन्यातील आपली पहिली ओव्हर निर्धाव टाकली. विश्वचषकमध्ये बुमराने सर्वात जास्त निर्धाव ओव्हर टाकण्याची कामगिरी केली आहे.
न्यूझीलंड (New Zealand) संघाचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून आयसीसी (ICC) विश्वचषकमधील पहिल्या सेमीफायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत-न्यूझीलंड सामना मॅन्चेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर खेळाला जात आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. भारतासाठी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने गोलंदाजी सुरू केली. आणि न्यूझीलंड फलंदाजांना पहिल्या 16 चेंडूत एकही रन काढू शकला नाही. मार्टिन गप्टिल (Martin Guptill) याने 17व्या चेंडूवर एक धाव घेत आपले खाते उघडले. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचआधी जसप्रीत बुमराहचे अनुकरण करत विराट कोहली ने केली नेट्समध्ये बॉलिंग, पहा Video)
मात्र, बुमराहने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये गप्टिलला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. गप्टिल 1 धाव करत बाद झाला. दरम्यान, बुमराह ने या सामन्यातील आपली पहिली ओव्हर निर्धाव टाकली. विश्वचषकमध्ये बुमराने सर्वात जास्त निर्धाव ओव्हर टाकण्याची कामगिरी केली आहे. आतापर्यंत बुमराहने 9 निर्धाव ओव्हर टाकल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड चा जोफ्रा आर्चर आहे. त्याने 8 निर्धाव ओव्हर टाकल्या आहेत.
Most maiden overs in #CWC19
9 - Bumrah
8 - Archer
6 - Cummins, Woakes
5 - Amir, Morris, Starc
All other Indian bowlers combined have only 6 maidens. #IndvNZ
— Bharath Seervi (@SeerviBharath) July 9, 2019
दुसरीकडे, न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलला यंदाच्या विश्वकपमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, 18 ओव्हरनंतर न्यूझीलंडची स्तिथी 2 बाद 69 धावा आहे. विल्यम्सनने यंदाच्या विश्वचषकमध्ये 500 धावांचा आकडा पार केला. केन सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एकमेव किवी खेळाडू आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2019 04:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

