टीम इंडिया (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) महत्त्वाच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) मोठे संकेत दिले आहेत. टीम इंडिया (Team India) रविवारी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडशी (New Zealand) भिडणार आहे. भारतीय संघ (Indian Team) 2003 नंतर विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला कधीही पराभूत करता आले नाही आहे. त्यामुळे आता 18 वर्षांचा पराभवाचा इतिहास बदलण्याची संधी ‘विराटसेने’कडे पुन्हा एकदा चालून आली आहे. स्पर्धेत आतापर्यंत पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे. अशा स्थितीत दोघांना भारत आणि न्यूझीलंडचे लक्ष आपल्या पहिल्या विजयाकडे असेल. या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) समावेश करण्याच्या प्रश्नावर म्हणाला की, तो नेहमीच आमच्या योजनांमध्ये सहभागी असतो. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. (IND vs NZ, T20 World Cup 2021: टीम इंडियाला ‘या’ किवी गोलंदाजापासून धोका, घातक गोलंदाजीने रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही ढकलले आहे बॅकफूटवर)

सामन्यापूर्वी मीडियाशी बोलताना विराट कोहली म्हणाला की, “शार्दुल ठाकूर हा हुशार खेळाडू आहे आणि त्याने अनेक प्रसंगी स्वत:ला सिद्धही केले आहे. पण तो संघात कुठे बसतो, हे पाहणे बाकी आहे.” अनेक तज्ज्ञ हार्दिक पांड्याच्या जागी शार्दुलला संधी देण्याच्या बाजूने आहेत, तर काही लोक वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जागी. भुवनेश्वर चांगल्या लयीत नाही आहे. पण असे असूनही ठाकूरला भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाणार नाही. दुसरीकडे, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हार्दिकच्या फिटनेसबद्दल विचारलेल्या प्रश्नाबाबत म्हणाला, “जर तुम्ही त्याच्या खांद्याच्या दुखापतीबद्दल विचारत असाल तर तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे.” पाकिस्तानविरुद्ध सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर त्याच्या खांद्याचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यानंतर सराव सत्रातही तो गोलंदाजी करताना दिसला. अशा स्थितीत रविवारी किवी संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघ हार्दिकला आणखी एक संधी देऊ शकतो. हार्दिकच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानने 10 विकेट्सने पराभव केला होता. भुवनेश्वर कुमारला संघातून वगळण्याच्या प्रश्नावर विराट कोहली म्हणाला की, “मला कुणालाही वगळण्याची इच्छा नाही. या खेळाडूंनी आमच्यासाठी दीर्घकाळ चांगली कामगिरी केली आहे. मागच्या सामन्यात आम्ही खराब खेळलो आणि हरलो हे तुम्हाला मान्य करावे लागेल. यासाठी कोणतीही गय केली जाऊ शकत नाही.” तसेच वरुण चक्रवर्ती, पूर्णपणे तंदुरुस्त असल्यास, किवीविरुद्ध आणि रविचंद्रन अश्विनच्या जागी त्याला पहिली पसंती दिली जाऊ शकते. अशाप्रकारे टीम इंडिया गेल्या सामन्यातील आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता कमीच आहे.

NZ विरुद्ध संभाव्य भारतीय XI: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार व वरुण चक्रवर्ती.