भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) संघात शनिवारपासून क्राइस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. मालिकेत 1-0 ने मागे राहिल्याने टीम इंडियासमोर आता क्लीन स्वीप टाळण्याचा दबाव आहे. सामन्याआधी संघासमोर मोठी समस्या आली आहे आणि आहे ती पृथ्वी शॉ (Prithvi Shaw). भारताचा युवा सलामी फलंदाज शॉच्या पायात सूज आली आहे ज्यामुळे दुसर्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळाबद्दल शंका निर्माण झाली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार शॉच्या पायाला सूज आली आहे, त्याचे कारण जाणून घेण्यासाठी त्याची रक्त तपासणी केली जाईल. शॉने बुधवारी सराव सामन्यात भाग घेतला नाही कारण संघात टच रग्बी खेळला होता.न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनमध्ये झालेल्या पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात पृथ्वीने चांगली सुरुवात करूनही मोठा डाव खेळण्यात यश आले नाही. शनिवारी दुसर्या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीने त्याला उत्तम कामगिरी करण्यासाठी पाठिंबा दर्शविला, पण शॉच्या दुखापतीमुळे क्राइस्टचर्चमध्ये भारतासाठी आणखी समस्या निर्माण होताना दिसत आहे. (ICC Test Rankings: विराट कोहली याने गमावले टेस्ट रॅंकिंगमधील अव्वल स्थान; अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल याचा टॉप-10 मध्ये समावेश)
दरम्यान, शॉच्या अहवालात काही गंभीर आढळले नसले तरी जर त्याला खेळण्यासाठी अस्वस्थ वाटत असेल तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होणे कठीण होईल. शॉच्या अनुपस्थितीत आजवर या दौऱ्यावर एकही सामना न खेळलेल्या शुभमन गिल (Shubman Gill) ला संधी दिली जाऊ शकते. गुरुवारी शुभमनने नेट्समध्ये चांगला सराव केला आणि अशी आशा आहे की शॉ जर खेळू शकला नाही तर त्याला मयंक अगरवालसह डावाची सुरूवात करण्यासाठी सांगितले जाऊ शकते. गुरुवारी नेट्स दरम्यान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री गिलच्या सत्राकडे अधिक लक्ष देताना दिसले.
शनिवारपासून सुरु होणाऱ्या सामन्यात टीम इंडियासमोर यंदाच्या दौऱ्यावरील सलग दुसते क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान असेल. यापूर्वी, न्यूझीलंडने वनडे मालिकेत भारताचा 3-0ने क्लीन स्वीप केला होता.